Eknath Shinde : ...अन् मुख्यमंत्री शिंदेंनी इंग्रजीतून ठोकलं भाषण; म्हणाले...

Ratnagiri Khed News : हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनीचा भूमिपूजन
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Konkan Political News : डेअरिंग केले म्हणून मुख्यमंत्री झालो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदी बोलताना चाचपडणारे शिंदे आता बिनधास्त हिंदी बोलताना दिसतात. यातच त्यांनी आता थेट इंग्रजीतूनच भाषण केले. रत्नागिरीतील खेडमध्ये एका कंपनीच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्र्यांनी शुद्ध इंग्रजीतून आपल्या महाराष्ट्राची महती सांगितली. या कंपनीचे स्वागत करत भविष्यातही एकत्र काम करण्याची ग्वाही शिंदेंनी या वेळी दिली.

खेड येथे गुरुवारी हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी (Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदेंनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणास सुरुवात केली. मात्र, कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट इंग्रजीतून त्यांचे स्वागत. 'वेलकम मिस्टर जॉन रॉडरिग्ज अॅन्ड ऑल रिप्रेझेन्टेटिव्ह फ्रॉम हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस ऑन सॅक्रेड लँड ऑफ कोकण..', असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Wardha Anil Deshmukh : 'साहेबांना' संपविण्यासाठी 'दादांचा' होतोय वापर

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणचा विकास होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, 'ठंडा मतलब कोका कोला नाही, तर आता ठंडा मतलब डेव्हलपमेंट, विकास असेही म्हणावे लागेल. रत्नागिरीला रत्नभूमी म्हणतात. कोकणात पारंपरिक व्यवसायाचे संवर्धन करून जगाची गरज ओळखून औद्योगिकतेची कास धरली पाहिजे. यातूनच ही कंपनी दोन टप्प्यात दोन हजार पाचशे कोटींची गुंतवणूक करत आहे.' (Latest Political News)

कंपनीचे स्वागत करताना शिंदेंनी महाराष्ट्रात आल्याचे फायदे सांगून जॉन यांना आस्वस्थ केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मिस्टर जॉन महाराष्ट्रा इज ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया. हिअर इज बिजनेस फ्रेंडली इन्व्हायर्न्मेंट. हॅज अलवेज एन्करेज हेल्थी पार्टनरशीप बिटवीन इंडस्ट्रीज अॅन्ट कम्युनिटी. महाराष्ट्रा इज वन ऑफ द इंडस्ट्रलाइज स्टेट टुडे. वी ऑफर न्यू सबसिडीज न्यू कंपनीज. वी हॅव स्कील्ड मॅनपॉवर, गुड इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी अँड अॅम्पल लँड फॉर कंपनीज.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दावोसमधील माहिती देत कंपनीने चांगला निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. शिंदेंनी सांगितले, 'मिस्टर जॉन तुम्ही येथे आलात याचा आभिमान आहे. यापूर्वी दावोसमध्ये एक लाख ३७ हजार कोटींचे एमओयू केले. त्यातील ८० टक्के कामांची अंमलबजावणी झाली आहे. आमचे राज्य परदेशी गुंतवणुकीत क्रमांक एकवर आहे. आता राज्याच्या विकासात भर घालण्याचा निर्णय घेतल्याने तुमचे कौतुक करतो. भविष्यातही आपण एकत्र काम करूयात.'

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
BRS News Maharashtra : तेलंगणात `कार` पंक्चर झाली, तर महाराष्ट्रात काय ? अनेकांचा जीव टांगणीला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com