PM Narendra Modi Rally : नकली शिवसेना ते बजेटचे तुकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Loksabha Election : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार हे नक्की, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक, धुळे, दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेतील. पंतप्रधान मोदींनी या सभेतून उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे नाव न घेता नकली शिवसेना, राष्ट्रवादी म्हणत डिवचले. तसेच काँग्रेसच्या धोरणावर जोरदार टीका केली.

कांदा उत्पादक शेतकरी केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर नाराज होता. निर्यात बंदी मागे घेतली असली तरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढाच वाचला. पंतप्रधान मोदींच्या PM Narendra Modi भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
PM Narendra Modi : मी हिंदू-मुस्लिम करायला लागलो तर..! पंतप्रधान मोदींनी फेटाळले आरोप

- एनडीए गठबंधन मोठा विजय मिळत आहे. ते महाराष्ट्रातील इंडी नेत्याच्या मोठ्या नेत्याच्या वक्तव्यावरून कळते.

- काँग्रेस Congress वाईट पद्धतीने पराभूत होत आहे ते विरोधीपक्ष देखील बनू शकत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यांना वाटत आहे त्यामुळे विरोधीपक्ष नेता मिळेल.

- नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार हे नक्की. जेव्हा विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेबांची येईल. बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेनेची काँग्रेस झाली तर शिवसेना बंद करेल.

- नकली शिवसेनेने बाळासाहेबांचे स्वप्न तोडले. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आयोद्धामध्ये राममंदिर व्हावे, बाळासाहेबांचे स्वप्न होते जम्मू कश्मीर 370 रद्द व्हावे. ही स्वप्न पूर्ण झाली मात्र याची सगळ्यात जास्त चिड नकली शिवसेनेला येत आहे.

- नकली शिवसेनावाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन फिरत आहे. जी काँग्रेस वीर सावरकरांना दिवसरात्र शिव्या देत आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी राष्ट्रभक्त जनता जेव्हा हे बघते तेव्हा त्यांना राग अनावर होत आहे.

- चार टप्प्यात चारही बाजुंनी लोकांनी त्यांना चीत केले आहे. मोदी गरीबांना मोफत राशन देत आहे. गरीबाला पक्के घर देत आहे. वीज कनेक्शन, हर घर जल देत आहे. आम्ही कधीच कोणाचा धर्म बघितला नाही. सगळ्याना योजनांचा लाभ देतो.

- काँग्रसेला देशातील बजेटच्या 15 टक्के बजेट अल्पसंख्यांकाना दायचे आहे. त्यातही आपल्या व्होटबँकला द्यायचे आहे. धर्माच्या नावावर यांनी देशाला वाटले. आता ही तेच करत आहे.

- काँग्रेस एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण मुस्लिमांना देईल. मी धर्माच्या आधारावर बजेट आरक्षण होऊ देणार नाही. मोदी वंचितचा चौकीदार आहे.

- कोरोना विरोधाती लढाईचे जगात कौतुक होत आहे. 70 वर्षी वरील ज्येष्ठांना मोफत इलाज ही मोदींची गॅरंटी आहे.

PM Modi
PM Narendra Modi Analysis : मोदीजी, उशिरा का होईना समाजाला दिलासा, विश्वास दिलात, हे बरं झालं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com