कोकणात कोण पराभूत होते, याचे उदय सामंतांनी गणित मांडले!

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली आहे.
Uday Samant, Narayan Rane
Uday Samant, Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात. मी टीका करणारा मंत्री नाही. आणि कुणावर टीकाही करीत नाही. तसेच, टीका करणाऱ्याना उत्तरही देत नाही. जे टीका करत देशात वातावरण निर्मिती करत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात, असा टोला शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव न घेता लगावला आहे. ते पिंपरी येथील आयपीएस कॅंपसमध्ये शब्द (पब्लिसिटी) संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

Uday Samant, Narayan Rane
'काँग्रेस मंत्र्यांना मी कामाला लावू शकतो आणि ते मी लावणार आहे'

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले असून एकमेकांवर टीका करण्याची कोणीच संधी सोडतांना दिसत नाही. दोन दिवसांपुर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत हजारो कोटींचे घोटाळे केल्यांचा त्यांच्यावर आरोप केले आहे. यावर भाजकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला असून शिवसेना व राऊतांना पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, नाराय़ण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार टीका केली. नेमका हाच धागा पकडत टीका करणारे आपल्या कर्माने संपतात आणि देशात वातावरण निर्माण करणारे कोकणात येऊन पडतात, असा अप्रत्यक्ष टोला आज सामंतांनी राणेंना लगावला. तसेच, मी काही चुकत असेल तर टीका करणाऱ्याने माझ्या विधानसभेत येऊन उभे राहून निवडून येवून दाखवावे, असे खुले आव्हानही राणेंना दिले. आता सामंत यांच्या टीकेवर भाजपच्या नेत्यांकडून काय उत्तर येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Uday Samant, Narayan Rane
"मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल" : संभाजीराजे छत्रपती

दरम्यान, या कार्यक्रमात बोलतांना सामंतांनी परवा सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी विद्यापीठास निधी देवू, असे आश्वासन दिले होते. त्यास ४८ तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन केंद्रास ३ कोटी देण्याचा ठराव मंत्री मंडळात संमत करण्यात आल्याचेही सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com