Mohit Kamboj News : 'फिर से खेला होबे', 4 जूननंतर 'राजकीय भूकंप?' भाजप नेते कंबोज यांचा दावा!

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गट आणि शरद पवार गट पुन्हा फुटणार? कशाच्या आधारावर कंबोज यांनी केला दावा?
Mohit Kamboj News
Mohit Kamboj NewsSarkarnama

Mumbai Political News : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातही लोकसभा निवडणुकांचे चार टप्प पार पडले आहेत. तर पाचवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून प्रचारसंभांचा धडाका सुरु आहे.

असं राजकीय वातावरण असताना आता मुंबईतील भाजपते नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा आणि खळबळजनाक दावा केला आहे. निवडणुकांचे निकालानंतर म्हणजेच चार जून नंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट पुन्हा फुटणार असा दावा कंबोज यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मोहित कंबोज यांनी एक्स अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे. कंबोज म्हणाले, "4 जून नंतर उद्धव ठाकरे सेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटणार आहे. शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी एसपीचे उर्वरित आमदार व नेते पक्षाला रामराम करणार आहेत.

अनेक आमदार, खासदार, नेते शिवसेना व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा कंबोज यांचा दावा केला आहे. "फिर से खेला होबे" म्हणत कंबोज यांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohit Kamboj News
Ajit Pawar News : अजित पवार आहेत तरी कुठे? बारामती-शिरुरच्या निवडणुकीनंतर कार्यक्रमांना दांडी!
Mohit Kamboj News
Chhagan Bhujbal News : भावेश भिंडेवरून राम कदमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप, मात्र भुजबळांनीच केला बचाव, म्हणाले...
Mohit Kamboj News
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

चार जून रोजी लोकसभा (lokSabha) निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. या निकालावर बरेच राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात किती जागांचे अंतर राहत, यावरही अनेक समीकरण ठरणार आहेत. दरम्यान भाजप नेत्याने केलेल्या राजकीय भूकंप होणार असल्याचा दाव्यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com