Ajit Pawar News : अजित पवार आहेत तरी कुठे? बारामती-शिरुरच्या निवडणुकीनंतर कार्यक्रमांना दांडी!

Lok Sabha Election 2024 : शिंदे फडणवीसांची मोदींच्या रोड शो ला उपस्थिती, अजित पवारांची मात्र दांडी...
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो पार पडला. मात्र मोदींच्या या 'रोड शो'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरस्थित असताना अजित पवार का नव्हते? या चर्चांना उधाण आले आहे. तब्येत ठीक नसल्याने अजित पवार मोदींच्या रोड शो ला उपस्थित नव्हते, असे सांगण्यात आले आहे.

बारामती आणि शिरुरची लोकसभा निवडणूक पार पाडल्यानंतर आता अजित पवार आहेत तरी कुठे? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय. मोदींच्या 'रोड शो'ला ही पवारांनी दांडी मारल्याचं दिसून आले. तब्येत ठीक नसल्याने पवार मोदींच्या (Narendra Modi) रोड शो ला उपस्थित नव्हते. मात्र त्यांची ही गैरहजरी आता राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar News
Narendra Modi News : पंतप्रधान मोदींनी शिवसेना ठाकरे गटासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे दिले आव्हान !
Ajit Pawar News
Prithviraj Chavan News : अजित पवार अन् शिंदे गटाला किती जागा मिळणार? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला...

अजित पवारांची गैरहजेरी चर्चेचा विषय -

धाराशिवच्या महायुतीच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. दिंडोरीतील प्रचारसभेतसुद्धा अजित पवारांऐवजी (Ajit Pawar) मंत्री छगन भुजबळांची उपस्थिती पाहायला मिळाली. कल्याणच्या सभेच्या ठिकाणीही पवार यांच्याऐवजी खासदार सुनील तटकरे उपस्थित राहिले होते. वाराणसीत मोदींनी अर्ज भरला तेव्हाही प्रफुल पटेल उपस्थित राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com