नवनीत राणांची तब्येत बिघडली? वकिलांचं कारागृह प्रशासनाला पत्र

खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात असून त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.
Navneet Rana
Navneet Ranasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भायखळा कारागृहात असून त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे. राणांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांना पत्र लिहून त्यांच्या उपचारासाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नवनीत राणा व रवी राणा यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवनीत राणा व रवी राणा (Ravi Rana) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने नुकतेच या दोघांनाही घरचं जेवण नाकारलं आहे. त्यातच आता नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले आहे. खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी कारागृह अधिक्षकांकडे केली आहे.

Navneet Rana
टिळकांनी समाधीसाठी समिती स्थापन केली, पैसे जमवले पण जीर्णोद्धार केला नाही! आव्हाडांचा दावा

नवनीत राणा यांना मणक्याचा त्रास आहे. न्यायालयीन कोठडी मध्ये असताना जमिनीवर बसवण्यात आल्याने आणि झोपावे लागत असल्याने त्रास वाढला आहे. सिटी स्कॅन करायला तुरुंग अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. जर नवनीत राणा यांना काही झालं तर तुम्ही त्याला जबाबदार असाल, असं वकिलांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे तात्काळ आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नवनीत राणा यांना २७ तारखेला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात यावा, असे सांगितले होते. याबद्ददल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले. वेदना असह्य झाल्याने नवनीत राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात आला. नवनीत राणा यांच्याबाबत हलगर्जी पणा केला. याबाबत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांनी वकिलांमार्फत केली आहे. या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष आणि राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना पाठवली आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मागील आठवड्यात अपूर्ण राहिली. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मागील आठवड्यात राणा दांपत्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी राणा यांच्या जामीनाला विरोध करत त्यांचे कृत्य लोकशाहीला मान्य होण्यासारखे नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की लोकशाहीमध्ये नागरी हक्कांनाही मर्यादा आहेत. राणा पती-पत्नीने सर्व मर्यादा ओलांडत आव्हान दिले. पोलिसांनी राणा दांपत्यांना वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र ते ऐकत नव्हते. वारंवार सोशल मिडियावरून आक्षेपर्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांशी बोलण्याचा पद्धतही राणां दापत्यांची चुकीची होती, असा दावा घरत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com