Beed : "बीडमधील मोठा नेता पक्ष सोडून गेला, पक्षाचे पदाधिकारी पक्षवाढीसाठी संघर्ष करीत आहेत. त्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी १७ तारखेला शरद पवारांची बीडमध्ये सभा होत आहेत," असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांनी रविवारी सांगितले.
रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. रोहित पवारांनी तुळजापूरमध्ये येऊन भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. "जे आम्हाला सोडून गेले, त्यांच्याबाबत जनतेनेच निर्णय घेतला पाहिजे. पक्षाचा विचार संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि भाजपसोबत गेलेल्यांना आमच्यामुळे त्रास होईल," असा इशारा रोहित पवारांनी दिला.
रोहित पवार म्हणाले, "सध्या राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती खालच्या पातळीवर गेली आहे, याला भाजपच जबाबदार आहे.पण सध्या नेत्यांमधील नाराजीबाबत चर्चा होत आहेत. कोण नाराज आहेत, कुणाच्या बैठका सुरु आहेत, यापेक्षा महाराष्ट्रातील जनता का नाराज आहे, हे पाहणे गरजेचे आहे, त्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नेत्यांनी एकमेकांवर नाराज राहण्यापेक्षा, लोकांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे,"
अजित पवारांसोबत गेलेल्या धनंजय मुंडे यांच्या होमपीचमध्ये होणाऱ्या सभेकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील युवा पिढीला पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील पदधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड सांभाळण्याची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर आली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महेंद्र धुरगुडे यांच्याकडे आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.