Congress News : 'भारत जोडो यात्रे' नंतर प्रजासत्ताक दिनापासून काँग्रेसचे हे नवीन अभियान सुरु होणार

Congress News : येत्या प्रजासत्ताक दिनापासून ‘हात से हात मिला’ हे अभियान सुरु होत आहे. पल्लम राजू हे या अभियानाचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत.
Congress News
Congress NewsSarkarnama

Congress News : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून करण्यात आली होती. या यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेसचे अजून एक अभियान सुरु होणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून ( २६ जानेवारीपासून) सर्व राज्यांत काँग्रेसचे ‘हात से हात मिला’ हे अभियान सुरु होत आहे. ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या अभियानाचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत.

Congress News
Girish Mahajan News : 'मार्ड'च्या डॉक्टरांसाठी गुड न्यूज ; निवासी डॉक्टरांची तब्बल एवढी पदे भरणार

विदर्भात प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक १० जानेवारी रोजी होणार आहे. या बैठकीत 'हात से हात जोडो'चा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होणार आहे. या अभियानासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भासह अन्य सर्व भागांतील नेत्यांशी संपर्क ठेवला आहे.

Congress News
MLA Yogesh Kadam Accident : अपघात नव्हे, घातपात ? ; चौकशीसाठी आमदार कदमांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

'विदर्भावर भर देणे राजकीय फायद्याचे ठरेल,'अशी आशा असल्याने कार्यकारिणी बैठक तेथे आयोजित केली आहे. या भागासाठीचा कार्यक्रम निश्चित होईल. तसेच तालुका पातळीवर कोण काम करेल, जिल्ह्याची जबाबदारी कुणाची हे ही निश्चित केले जाणार आहे.

हात से हात जोडो अभियान 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अभियान तालुका पातळीवर यात्रा, जिल्हा स्तरावर अधिवेशन आणि राज्य पातळीवर मोठ्या यात्रेचं आयोजन, अशा तीन स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अधिक कालावधीपासून राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो पदयात्रा सुरू आहे.काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत अनेक सेलेब्रिटी सामील झाले आहेत.

अभिनेता अमोल पालेकर, अभिनेत्री रिया सेन, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. चित्रपट कलाकारांच्या उपस्थितीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला झळाळी आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com