
Maharashtra Political News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तरुंगाच ‘नरकातील स्वर्ग’मध्ये लिहिलं आहे. पुस्तकात त्यांनी राजकारणातील अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भातही मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
संजय राऊत यांचे एकेकाळचे मित्र व त्याच काळातील शिवसेनेतील त्याचे सहकारी एकनाथ शिंदे यांना “ नरकातला स्वर्ग “ या पुस्तकाची प्रत पाठवली. शिंदे व सुरत गुवाहटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी हे पुस्तक जरूर वाचावे, असे टोला लगावण्यास राऊत विसरले नाहीत.
ज्येष्ठ गीतकार, जावेद अख्तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले आहे.
या पुस्तकात राऊतांना अनेक गोप्यस्फोट केले आहेत. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ईडी, 'सीबीआय' वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो, हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल ! कळावे, असे राऊत यांनी पुस्तकासोबत शिंदेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात १०० दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. 'ईडी'सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात," असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
मी बालवाड्मय वाचत नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राऊतांनी आपल्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे. मी कादंबऱ्या वाचनं कधीच सोडलेलं आहे. कथा-कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझ वय राहिलेलं नाही. त्यामुळेच मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशा शब्दात फडणवीस पुस्तकाची खिल्ली उडवली होती. त्यांचे सोडून द्या, ते कोण आहे. ते खूप मोठे नेते आहेत का? असा सवालही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.