Sanjay Raut Slams Amit Shah : 'ये डर अच्छा है..; शाहांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचे सडेतोड उत्तर, मातोश्रीचा धसका...

Amit Shah News : राऊतांनी टि्वट करीत अमित शाह यांच्या भाषणात समाचार घेतला आहे.
Sanjay Raut Slams Amit Shah
Sanjay Raut Slams Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शनिवारी नांदेडमध्ये सभा झाली. या सभेमध्ये अमित शाह यांच्या निशाण्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे होते.

उद्धव ठाकरेंवर घणाघात करताना चार प्रश्न अमित शाह यांनी विचारले आहेत. अमित शाह यांच्या नांदेडच्या भाषणाची खासदार संजय राऊत खिल्ली उडवली आहे. राऊतांनी टि्वट करीत अमित शाह यांच्या भाषणात समाचार घेतला आहे.

Sanjay Raut Slams Amit Shah
Praful Patel News : प्रफुल्ल पटेल कसे बनले पवारांचे निकटवर्तीय ? ; NCPचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद, सहा वेळा खासदार..

उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी भाजप अध्यक्ष असताना विधानसभा निवडणूक २०१९ बद्दल चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे ठरलं होते. परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा सत्तेसाठी युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले असा घणाघात उद्धव ठाकरेंवर शाह यांनी केला आहे.

"अमित भाई यांच्या भाषणातील 20 मिनिटात 7 मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम," अशा शब्दात संजय राऊतांनी यांनी अमित शाह यांच्या भाषणाची खिल्ली उठवली आहे.

Sanjay Raut Slams Amit Shah
Maharashtra politics : गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरुन काढणार ? खडसेंनी सांगितलं कारण , 'जलजीवन मिशन योजनेत..'

"गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन," असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

"अमित भाई यांच्या भाषणातील२० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम.शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले.तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे.ये डर अच्छा है.जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे.पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले.एवढा धसका घेतलाय," असे राऊत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते अमित शाह

उद्धवजी, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात.दोन बोटीत पाय ठेवता येत नाही. तिहेरी तलाक, राम मंदिर, यूसीसी आणि मुस्लिम आरक्षणावर तुमचे धोरण जनतेसमोर स्पष्ट करा, तुमची गुपिते आपोआप उघड होतील, असे अमित शाह म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com