
'विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा' असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अधिवेशनात कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांनी आदेश देताना सावधगिरी बाळगण्याची सूचनाही फडणवीस यांनी दिली. ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
ठोकून काढा म्हणजे काय, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. फडणवीस हे गुंडाची भाषा वापर आहेत, असे राऊत म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ठोकून काढण्याची भाषा करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अमित शाह यांनीही राजीनामा द्यायला पाहिजे. दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ठोकशाहीची भाषा काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ, असा इशारा राऊतांना दिला.
अमित शाह हे व्यापारी नेता आहे. ते आपले गृहमंत्री आहे, हे सांगायला लाज वाटते. गुजरातच्या व्यापाऱ्याला आम्ही महाराष्ट्र लूटू देणार नाही, असे राऊत म्हणाले.
भाजपने पैसे देऊन आणि ईडीच्या धमक्या देऊनच त्यांनी आमदार फोडले. देशाचा गृहमंत्री कसा नसावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना एका राज्यातून तडीपार केले होते, असे सांगत राऊतांनी शाह यांच्याबाबत आपल्याला अधिक बोलायला लावू नका. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलतील, असे त्यांनी सांगितले.
आम्ही विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या फुग्याला टाचणी लावली. आमचा एकही आमदार फुटला नाही. पण त्यांचे २० आमदार फोडले, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानाचा संजय राऊतांनी समाचार घेतला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
"महाविकास आघाडीचे जे आमदार फुटले त्यांना प्रत्येकी ५०, कोटी रुपये फडणवीस यांनी दिले. 20 आमदार फोडल्याचे फडवणीस गर्वाने सांगत आहे. त्यांनी अटक करा.त्यांच्यावर ईडी-सीबीआयची चौकशी लावा. तुम्हाला भ्रष्टाचार नकोय तर भ्रष्टाचारी गृहमंत्री कशाला पाहिजेत", असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.