Suresh Mhatre News : हिंमत असेल तर मुरबाडमधून उभे रहा; खासदार म्हात्रेंचे कपिल पाटलांना पुन्हा खुले चॅलेंज

Bhivandi Politics News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार पाटील यांनी विधान सभेसाठी उमेदवारी मागणार असल्याचे वक्तव्य केले.
Kapil Patil, Suresh Mhatre
Kapil Patil, Suresh MhatreSarkarnama
Published on
Updated on

Dombivli News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला आहे. या निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागल्याने बॅकफुटवर यावे लागले आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात असल्याने भिवंडी मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (Suresh Mahatre) यांनी भाजपचे कपिल पाटील यांना चॅलेंज देत त्यांचा पराभव केला होता. त्यातच आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार पाटील यांनी विधान सभेसाठी उमेदवारी मागणार असल्याचे वक्तव्य केले.

त्यानंतर पुन्हा एकदा खासदार बाळ्या मामा यांनी पुन्हा पाटलांना चॅलेंज देत हिंमत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे रहा, असे आव्हान दिले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाळ्या मामा व कपिल पाटील यांच्यातील कलगीतुरा रंगणार आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाहणी भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सोमवारी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार म्हात्रे यांनी माजी खासदार पाटील यांना खुले चॅलेंज दिले.

मतदार संघातील नागरिकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढणार, कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरात केले होते. यालाच आता भिवंडी खासदार म्हात्रे यांनी उत्तर देत पाटील यांनी निवडणुकीत उतरावे, असे आव्हान दिले.

Kapil Patil, Suresh Mhatre
Bhujbal Meet Pawar : साथ सोडली तरी भुजबळांचा आजही पवारसाहेबांवर लईच भरोसा

कपिल पाटलांची (Kapil Patil) हिंमत असेल तर त्यांनी मुरबाड मतदारसंघातून उभे राहावे. मी लोकसभेला त्यांना चॅलेंज दिले होते, मी आजही सांगतो. मतदारानी त्यांना स्पष्ट नाकारले आहे. तुमच्या हातात जवळपास तीस वर्ष सत्ता होती.

तीस वर्ष सत्तेत राहून काय केलं ते तर सांगा? मुरबाड काय कल्याण पश्चिम काय कुठे उभे राहायचे असेल त्या ठिकाणाहून निवडणुकीत उभे रहा. या निवडणुकीत त्यांना माझे खुले आव्हान आहे. ही जनता आहे, तुम्ही कुठूनही निवडणूक रिंगणात उतराल तर तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

Kapil Patil, Suresh Mhatre
Sambhaji Raje Chhatrapati : पालकमंत्र्यांने मला पुरोगामीपणा शिकवू नये, संभाजीराजे मुश्रीफांवर बरसले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com