APMC Election Mumbai : अजितदादांची 'चुप्पी', नाईकांना श्रेष्ठींचा 'आदेश', पवारांच्या शिलेदाराची 'मूकसंमती' अन् मुंबई बाजार समितीचं राजकारण..!

ShivSena Eknath Shinde Prabhakar Patil Chairman Mumbai Agricultural Produce Market Committee : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिलेदार सभापतिपदी विराजमान झाला आहे.
APMC Election Mumbai
APMC Election MumbaiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही 10 हजार कोटींवर आहे. अशा या बाजार समितीवर वर्चस्वासाठी सर्वच पक्षांची चढाओढ असते. अशा या बाजार समितीवर आता शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिलेदार पुढील सहा महिने वर्चस्व गाजवणार आहेत.

शिवसेनेचे प्रभाकर पाटील ऊर्फ प्रभू यांची सभापतिपदी, तर हुकुमचंद आमधरे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने दाखवलेल्या एकोप्याच्या राजकारणाने, मात्र अस्वस्थता निर्माण केली. बाजार समितीमधील कोटींची उलाढालच या एकोप्यामागील कारण असल्याची चर्चा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मंत्री गणेश नाईक यांनी यांच्याकडील चिठ्ठीने पाटील आणि आमधरे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाला. गणेश नाईक यांनी श्रेष्ठींच्या आदेशानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पारड्यात चिठ्ठीच्या माध्यमातून मतं टाकले. सत्तेची चावी मिळवणे सोपे नसते. पण सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये यासाठी खटके उडतात. पण मुंबई बाजार समितीत सत्ताधारी आणि विरोधक मात्र एक आले होते.

APMC Election Mumbai
BJP Maharashtra Politics : ठाकरेंची शिवसेना फोडाफाडीत व्यग्र, त्याच शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून 600 तक्रारी; मंत्री नाईकांचा लगेचच स्वबळाचा सूर

मुंबई बाजार समितीत महायुतीने काँग्रेसला (Congress) बरोबर घेऊन आपण सर्व भाऊ भाऊ, असे म्हटले आहे. या बाजार समितीवर स्थापनेपासून राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीवर, आता सभापती आणि उपसभापती निवडताना, दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.

APMC Election Mumbai
Madhi Kanifnath Yatra : मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी, 'एमआयएम'चा संताप; प्रशासनाला कारवाईसाठी दिलं पत्र

अजित पवार नाॅटरिचेबल

राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी नाॅटरिचेबल राहिले. अजित पवार यांच्याकडून बाळासाहेब सोळसकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. यासाठी अजित पवार यांचे मंत्री देखील आग्रही होते. अजित पवार यांच्या काही शिलेदारांनी वनमंत्री गणेश नाईक आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे फिल्डिंग देखील लावली होती. अजित पवार देखील शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करतील आणि करिश्मा दाखवतील, अशी चर्चा रंगली होती.

आमदार शिदेंची मूकसंमती...

असे असतानाच अजित पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आले पदाधिकार्‍यांचा संपर्क होऊ शकला नाही. एकप्रकारे प्रभाकर पाटील यांच्या निवडीचा मार्गच यामुळे मोकळा झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिंकांत शिंदे बाजार समितीत किंगमेकरच्या भूमिकेत असतात. त्यांनीही या निवडीला मूकसंमती दिल्याचे दिसले.

मंत्री नाईक अन् शिवसेना दूरच...

गणेश नाईक यांनी नवी मुंबईत राजकारण करताना वर्चस्व गाजवले असेल, तरी त्यांनी बाजार समितीच्या राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नाही. शिवसेने देखील नवी मुंबई, मुंबई वर्चस्व गाजवताना बाजार समितीत कधीच वर्चस्व मिळवता आले नव्हते. आता मात्र महायुतीत राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा शिलेदार बाजार समितीच्या सभापतिपदावर विराजमान केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com