BJP Maharashtra Politics : ठाकरेंची शिवसेना फोडाफाडीत व्यग्र, त्याच शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून 600 तक्रारी; मंत्री नाईकांचा लगेचच स्वबळाचा सूर

BJP Minister Ganesh Naik janta darbar Thane Shivsena DCM Eknath Shinde : भाजप मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात घेतलेल्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस पडला.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यात 'ऑपरेशन टायगर' राबवत असताना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात व्यग्र दिसते. यातच एकनाथ शिंदेंना भाजपने त्यांच्या बालेकिल्ला ठाणे जिल्ह्यात घेरलं आहे.

भाजप मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे इथं घेतलेल्या जनता दरबारात तब्बल 600 तक्रार प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींवरून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आगामी काळात नागरिकांचा कल कोणत्या बाजूने राहील, याच अंदाजावर चर्चा सुरू झाल्या आहेत. याशिवाय मंत्री नाईक यांनी देखील ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

भाजप मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील बालेकिल्ल्यात जनता दरबार घेतल्यावर भाजपविरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. यातच मंत्री नाईक यांच्या जनता दरबारात एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींवरून शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा कल बदलतोय, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

Ganesh Naik
Madhi Kanifnath Yatra : मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी, 'एमआयएम'चा संताप; प्रशासनाला कारवाईसाठी दिलं पत्र

मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) देखील जनतेचा प्रतिसाद पाहू खूश झाले आहेत. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद व्यक्त करताना, आपला जनता दरबार जनतेचा शब्द पाळण्यासाठी असतो. नागरिकांच्या तक्रारी, निवेदनांवर पुढील काही दिवसांत कारवाई होईल, त्यासाठी पुन्हा 15 दिवसांनी त्याचा आढावा घेणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री नाईक यांनी दिली.

Ganesh Naik
Shiv Sena Operation Tiger in Kolhapur : शिवसेनेने गुपचूप फोडली 'स्वाभिमानी', निष्ठावंत म्होरके गळाला अन् आता 'जनसुराज्य'च्या आमदारावरही दावा!

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा, अशी इच्छा असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केली. हाच सूर मंत्री गणेश नाईक यानी आवळला आणि निवडणुका स्वबळावर झाल्या तर त्या लढवायला आवडेल, असे सांगून आणखी फोडणी दिली.

दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे इथं घेतलेल्या जनता दरबारावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रत्येक मंत्र्यांनी जिल्हा, तालुका पातळीवर जनता दरबार घेतला पाहिजे. नागरिकांच्या समस्या सुटण्यासाठी काम केले पाहिजे, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com