BMC Engineers: चक्क प्रमोशनच नाकारले! मुंबई महापालिकेतील 19 इंजिनिअर्सबाबत वेगळाच संशय; काँग्रेसकडून चौकशीची मागणी

BMC Engineers Promotion Rejected: मुंबई महापालिकेतील १९ अभियंत्यांनी पदोन्नती नाकारल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रकल्पांतील पोस्टिंग, बदलीची भीती आणि आर्थिक हितसंबंधांच्या आरोपांमुळे काँग्रेसने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
BMC engineers promotion controversy
BMC engineers promotion controversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Engineers: मुंबई महानगरपालिकेतून एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. महापालिकेतील तब्बल १९ अभियंत्यांनी त्यांना मिळालेले प्रमोशन स्वतःहून नाकारल्याचे उघड झाले आहे.

प्रमोशन नाकारून एकाच पदावर वर्षानुवर्षे बसलेल्या या सर्व अभियंत्यांची आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पदोन्नतीला का दिला नकार?

पदोन्नती नाकारणाऱ्यांमध्ये एकूण १९ अभियंत्यांचा समावेश आहे. यात १७ सहाय्यक अभियंत्यांनी 'कार्यकारी अभियंता' पदावरील, तर २ कार्यकारी अभियंत्यांनी 'उपमुख्य अभियंता' पदावरील प्रमोशन नाकारले आहे. यातील काही अभियंत्यांनी लेखी नकार दिला आहे तर काहींनी प्रमोशनसाठी आवश्यक असणारी अधिकृत कागदपत्रेच सादर न करून तांत्रिकदृष्ट्या पदोन्नती टाळली आहे.

BMC engineers promotion controversy
Maharashtra News Live Update : कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना गावगुंडांकडून मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हजारो कोटींच्या 'मोठ्या' विभागांमध्येच पोस्टिंग

काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. प्रमोशन नाकारणारे हे बहुतांश अभियंते एसआरए, डीपी, वॉटर सप्लाय प्रोजेक्ट्स आणि एमएसडीपी यांसारख्या महापालिकेच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पांच्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. हे प्रकल्प हजारो कोटी रुपयांचे आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पांचे बजेट आता ६५,००० कोटी रुपयांवरून थेट ८०,००० कोटी रुपयांवर गेले आहे, असा दावा आझमी यांनी केला आहे.

काँग्रेसची पालिका आयुक्तांकडे मागणी

पदोन्नती नाकारणाऱ्या सर्व १९ अभियंत्यांची सध्याची पोस्टिंग, त्यांचे कामाचे स्वरूप आणि तिथे राहण्यामागची कारणे यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. जे अधिकारी प्रमोशन नाकारत आहेत, त्यांची सध्याच्या पदावरून तातडीने इतरत्र बदली करण्यात यावी.

एकाच जागी वर्षानुवर्षे बसलेल्या अधिकाऱ्यांना हटवून, बाजूला राहिलेल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इतर अभियंत्यांनाही या मोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची समान संधी मिळावी. अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

BMC engineers promotion controversy
Thane Politics : मसाल्यावरून शिवसेना-भाजपमध्ये 'भडका'; नगरसेवक आक्रमक; महापालिकेच्या कारवाईला विरोध

बदलीच्या भीतीने घेतला निर्णय?

काही अभियंते अशा मलईदार किंवा मोठ्या विभागांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसले आहेत. जर त्यांनी मिळालेले प्रमोशन स्वीकारले, तर त्यांची नियमानुसार दुसऱ्या विभागात बदली होईल, अशी भीती या अभियंत्यांना आहे. याच बदलीस घाबरून आणि स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हे अधिकारी हक्काचे प्रमोशन नाकारत आहेत, असा आरोपही आझमी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com