Thackeray brothers Alliance : मनसेचा बडा नेता ठाकरेंच्या युतीवर प्रचंड नाराज? भाजपमध्ये जाणाऱ्या जिगरी मित्राला ‘तू तुझं बघ’ म्हणाले, पण...

Mumbai BMC election : युती झाल्यापासून संदीप देशपांडे हे सोशल मीडियापासून लांब गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे ते मनसेत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Sandeep Deshpande, Raj Thackeray, Santosh Dhuri
Sandeep Deshpande, Raj Thackeray, Santosh DhuriSarkarnama
Published on
Updated on

Santosh Dhuri joins BJP : मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युती झाली आहे. मात्र, या युतीत पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, राजसाहेबांनी पक्ष सरेंडर केल्याचा आरोप करत मनसे नेते संतोष धुरींनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या युतीबाबत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

संतोष धुरी यांनी मीडियाशी बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचेही नाव घेतले. धुरी आणि देशपांडे हे मनसेच्या स्थापनेआधीपासूनच मित्र आहेत. अनेक आंदोलनांमध्य त्यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला होता. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हे दोघेही त्यांच्यासोबत आले. तेव्हापासून ते मनसेमध्ये एकत्रित होते, असे धुरींनीच सांगितले.

भाजपमध्ये जाण्याबाबत धुरी यांनी संदीप देशपांडे यांच्याकडे विचार मांडले. त्यावेळी देशपांडे यांनी तू तुझं बघ, मी येत नाही, असे उत्तर दिल्याचे धुरींनी सांगितले. देशपांडे यांचे मन मोठे आहे, माझे नाही, असेही धुरी म्हणाले. मात्र, मोठे मन असलेल्या संदीप देशपांडे यांना जागावाटपाच्या कुठल्याही चर्चेत सहभागी करून घेतले नसल्याचा आरोपही धुरींनी केला. त्यावरून देशपांडे नाराज असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Sandeep Deshpande, Raj Thackeray, Santosh Dhuri
Election Commission : ZP निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना धाडले आदेश

युती झाल्यापासून देशपांडे हे सोशल मीडियापासून लांब गेल्याचे चित्र आहे. मुंबईतील प्रचारामध्येही ते फारसे सक्रीय नसल्याचे दिसते. त्यांनी फेसबुक व ट्विटरवर अखेरची पोस्ट २६ डिसेंबर रोजी केली होती. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना त्यांनी एकही पोस्ट केलेली नाही. विशेष म्हणजे ते मुंबईतील पक्षाचा बडा चेहरा म्हणून ओळखले जातात.

Sandeep Deshpande, Raj Thackeray, Santosh Dhuri
Santosh Dhuri News : भाजपमध्ये प्रवेश करताच संतोष धुरींचा थेट राज ठाकरेंवर सर्वात मोठा आरोप; म्हणाले, पक्षासह दोन किल्ले सरेंडर...

ठाकरे बंधूंनी नुकताच पक्षाचा वचननामा जाहीर केला. याबाबतही देशपांडे यांनी एक शब्दही सोशल मीडियात लिहिलेला नाही. त्यामुळे धुरी यांनी दिलेले नाराजीचे संकेत खरेच असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप देशपांडे यांनी धुरी यांच्या आरोपांबाबत भाष्य केलेले नाही. मीडियापासूनही सध्या ते चार हात लांब असल्याचे दिसते. त्यांची ही नाराजी आता समोर येऊ लागली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com