Mumbai elections: मुंबईत चार जागावरून ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच; मातोश्रीवरील युतीच्या चर्चेनंतर बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

Thackeray brothers alliance News : मुंबई महापालिकेतील चार जागावरून ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच दिसत आहे. त्यातच शनिवारी दुपारी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह प्रमुख नेतेमंडळीने भेट घेत यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
MNS Leader Bala Nandgaonkar Critcise Government News
MNS Leader Bala Nandgaonkar Critcise Government NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरेंच्या मनसेच्या युतीची घोषणा चार दिवसापूर्वीच करण्यात आली आहे. त्यानंतरही काही ठिकाणच्या जागेवरून दोन्ही पक्षात रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. मुंबई महापालिकेतील चार जागावरून ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच दिसत आहे. त्यातच शनिवारी दुपारी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह प्रमुख नेतेमंडळीने भेट घेत यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे.

मुंबई महापालिकेतील ठाकरे बंधूंची युतीचे घोडे चार जागावरून अडले आहे. त्यावर चर्चा झाल्यानंतर याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, मनसेतील नेत्यांनी युतीबाबत बोलत असताना संयमाची भूमिका घेण्यास हवी. काही जागा देण्याची व काही जागा घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यावेळेस चर्चेतून मार्ग निघतो, असा सूचक इशारा दिला आहे. त्यासोबतच युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून रात्री उशिरा एक बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा तिढा सुटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

MNS Leader Bala Nandgaonkar Critcise Government News
Shivsena Vs BJP : 'तुमच्या भागात कधी शिवसेना वाढू दिली नाही... कधी नगरसेवकही झालेला नाही' : नीलम गोऱ्हेंविरोधात कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक

दरम्यान, चार दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना व राज ठाकरेंची मनसेसोबत येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा दोन बंधूनी एकत्र येत केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत येण्याची तयारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे.

MNS Leader Bala Nandgaonkar Critcise Government News
Congress Candidate First List : काँग्रेसची 20 जणांची पहिली यादी जाहीर; शहराध्यक्ष, माजी महापौरांसह नऊ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी

त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसला (Ncp) काही जागा सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीला राष्ट्रवादीच्या माध्यमातून पॉवर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या जागावाटपाच्या चर्चेकडे लागले आहे.

MNS Leader Bala Nandgaonkar Critcise Government News
NCP News: पुण्याच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट; दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता मावळली असतानाच शरद पवारांचा बडा नेता अजितदादांना भेटला

येत्या काळात मुंबईत मराठी मतांचे विभाजन टाळणे, हे महाविकास आघाडीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. अशातच, शरद पवार यांनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात किमान मुद्द्यांवर सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेनेची ताकद आणि राज ठाकरेंची आक्रमक शैली एकत्र आल्यास महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार आहे.

MNS Leader Bala Nandgaonkar Critcise Government News
BJP Election News: घासून नाही तर ठासून...! भाजपची दक्षिण भारतात दमदार एन्ट्री; कट्टर विरोधी राज्यात पहिला महापौर बनवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com