Aaditya Thackeray News : मुंबईत भाजपच्या महापौरांचा कार्यकाळ अजून सुरूही नाही अन् त्याआधीच..! आदित्य ठाकरेंचा पहिला वार...

Mumbai congestion tax : मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालत असूनही, भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळात देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काहीच ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
Aaditya Thackeray, Ritu Tawde
Aaditya Thackeray, Ritu TawdeSarkarnama
Published on
Updated on

BJP mayor Mumbai : मुंबई महापालिका महायुतीची सत्ता आली असून रितू तावडे या भाजपच्या नगरसेविका महापौरपदी विराजमान होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला उपमहापौरपद आले आहे. येत्या ११ तारखेला महापौर-उपमहापौर कार्यभार हाती घेतील. पण त्याआधीच भाजपच्या एका नगरसेवकाच्या मागणीमुळे वाद निर्माण झाला असून महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्याला विरोध केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतील वाहनांवर कंजेशन टॅक्स लावण्याची मागणी केली आहे. त्यावर ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे. मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांचे बंधू मकरंद नार्वेकर ह्यांनी मुंबईतील वाहनांवर Congestion Tax लावण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेला लिहिले आहे. मुंबईचं काहीही भलं न करता, मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं हीच भाजपची वृत्ती आहे, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालत असूनही, भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळात देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काहीच ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. उद्योग आणि रोजगार मात्र सातत्याने मुंबईतून बाहेर नेण्यात आले, असे ठाकरेंनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  

Aaditya Thackeray, Ritu Tawde
Zilla Parishad election results : भाजपने 2017 चे सगळे रेकॉर्ड मोडले; CM फडणवीसांनी विरोधकांना हादरा देणारी सगळी आकडेवारीच सांगितली...

गेल्या ४ वर्षांत भाजपच्या राज्य सरकारकडून मुंबई लुटण्यासाठी रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि ह्यासारखे अनेक घोटाळे खुलेआम केले गेले, असे जोरदार हल्ला आदित्य ठाकरेंनी चढविला आहे. आणि तरीही, हा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याच कष्टकरी मुंबईकरांकडून अजून पैसे उकळण्याची मागणी करण्याचं धाडस करतो?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Aaditya Thackeray, Ritu Tawde
BJP defeat : वारं फिरलंच नाही! महापालिकेत ऐतिहासिक विजय मिळविलेल्या भाजपला ZP निवडणुकीत दारूण पराभव

भाजपा मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते? भाजपच्या कंत्राटदारांनी मुंबईतल्या रस्त्यांची दुरावस्था करुन जे आपले घामाचे पैसे उधळले आहेत, त्यासाठी मुंबईकरांना भाजपा कर परतावा करणार का? भाजपने खासगी बस कंपन्यांना फायदा होण्यासाठी BEST बसेस मधे जी कपात केली, त्त्यासाठी भाजपा कर परतावा करणार का? भयंकर AQI मुळे श्वासोच्छवासादरम्यान आपल्या शरीरात जाणाऱ्या प्रत्येक SPM कणांसाठी भाजपा कर परतावा करणार का? मकरंद नार्वेकर ह्यांच्या मुंबई लुटणाऱ्या ह्या प्रस्तावाशी भाजपा सहमत आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीही आदित्य यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com