

Devendra Fadnavis statement : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निकालामध्ये पुन्हा एकदा भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसते. या निवडणुकीत भाजपने २०१७ चे सर्व रेकॉर्ड मोडल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. याविषयी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीच सत्ता येईल, हे स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, सांगली, परभणी आणि सातारा या सात ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे.
शिवसेना रत्नागिरी आणि रायगड या दोन ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात नंबर एकवर आहे. कोल्हापूर आणि लातूरमध्येही महायुती नंबर एकवर आहे. अतिशय चांगला कल समोर आला आहे. भाजपने २०१७ चा रेकॉर्डने तोडला आहे. २०१७ मध्ये या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला १४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आतापर्यंत घोषित झालेल्या निकालांमध्ये भाजपला २३६ जागा मिळाल्या आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. आतापर्यंत घोषित जागांपैकी ४१० जागा भाजपने मिळविल्या आहेत. याठिकाणीही २०१७ चा रेकॉर्ड मोडला आहे. त्यावेळी भाजपला २८४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपने मोठी उडी मारली आहे. भाजपला १२५ समित्यांपैकी ५० समित्या भाजपकडे असतील. २६ शिवसेनेकडे तर २३ राष्ट्रवादीकडे असतील. सात ते आठ काँग्रेस, सात ते आठ शरद पवारांच्या पक्षाकडे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाच राहतील, अशी सध्याची परस्थिती आहे. महायुतीला शंभरहून अधिक समित्या जिंकता आल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता या निकालातून समोर आली आहे. आधी नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदांच्या निकालांमध्ये सरकारच्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. आता भाजप शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर एकचा पक्ष असल्याचे आता स्थापित केले आहे. विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. विरोधी पक्षात काम करताना जनतेत जाऊन जनतेचा आवाज बनावा लागतो. सध्या विरोधी पक्ष फक्त माध्यमांमध्ये दिसत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.