Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नुकतीच भेट घेतली आहे.
या भेटीत अजितदादांनी आपला राजीनामा मागितला नसल्याचे मुंडे यांनी माध्यमांना सांगितले. अजितदादांनी माझा राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईन, अशी माहिती मुंडे यांनी 'साम' टीव्हीला दिली.
देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवलं आहे. सर्व पक्षांकडून मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. काल (सोमवारी) मुंडे यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.
आपल्यावर होत असलेल्या आरोपाबाबत मुंडेंनी अजितदादांना स्पष्टीकरण दिले. अजितदादांशी झालेल्या भेटीनंतर मुंडे यांनी माध्यमांषी संवाद साधला. ते म्हणाले, "अजितदादा आणि माझी विविध विषयांवर चर्चा झाली. अन्न व नागरी खात्याचा पदभार स्वीकारल्यामुळे व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादांची भेट घेतली. माझ्याकडे त्यांनी राजीनामा मागितला नाही. मी राजीनामा दिला नाही,असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीत अजितदादांनी आपला राजीनामा मागितला नसल्याचे मुंडे यांनी माध्यमांना सांगितले. अजितदादांनी माझा राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईन, असे मुंडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.