Mumbai DCC Bank : पाडव्याच्या मुहूर्तावरच 'महायुतीत' स्फोट? मुंबई बँकेवरून भाजप-शिवसेना आमनेसामने; दरेकरांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी एकनाथ शिंदेंचे प्लॅनिंग

Mumbai DCC Bank election news : ठाणे-पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठं यश मिळाले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई मध्यवर्ती बँकेत सत्ता मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis And Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप व शिवसेना आमने-सामने येणार आहेत. बँकेवर गेल्या अनेक दिवसापासून असलेले भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तयारी केली जात आहे. त्यानिमित्तानेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरच शिवसेनेची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील सहकारी क्षेत्रावरील नियंत्रण आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून पूर्ण ताकद पणाला लावली जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी सुरू केलीय. दरम्यान या बँकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा मोठा प्रभाव आहे. ठाणे-पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठं यश मिळाले होते. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई मध्यवर्ती बँकेत सत्ता मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यासाठी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरच शिवसेनेची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासह मुंबई महापालिकेचे उपमहपौर संजय घाडी व शिवसेनेचे बडे नेते उपस्थित होते. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सध्या या बँकेच्या संचालक मंडळात २० सदस्य आहेत. यात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. या संचालक मंडळात प्रसाद लाड आणि तेजस्वी घोसाळकर यांसारख्या भाजप नेत्यांचा, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपच्या दीर्घकालीन वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची रणनीती या माध्यमातून आखली जात आहे.

गेल्या काही दिवसापासूनच शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपला टक्कर देण्याचे प्लॅनींग शिव्न्सकडून केले जात आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तरीही येत्या काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून चाचपणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.