
Raju Patil vs Rajesh More : कल्याण-डोंबिवलीमधील संथगतीच्या विकास कामांवरून नेते राजू पाटील यांनी 'मनसे स्टाईल'ने सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागेल, अशी परिसरात उपाहासात्मक पोस्टरबाजी केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ही पोस्टरबाजी चांगलीच जिव्हारी लागली आहे.
शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी सोशल मीडियावर एक एप्रिलला राजू पाटील आमदारांची शपथ घेणार, मनसेच्या शेडो कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, त्यांच्या शपथविधीला जगभरातील राष्ट्रीय अध्यक्ष कल्याणमध्ये येणार असल्याचे म्हणत, खिल्ली उडवली आहे.
डोंबिवलीमधील कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा पुलाच्या कामाचे अतिशय संथगतीने सुरू आहे. यावरून मनसेचे (MNS) नेते माजी आमदार राजू पाटील यांनी परिसरात बॅनरवाजी करत, सत्ताधाऱ्यांना डिवचलं. समाज माध्यमांवरून हा बॅनर शेअर करताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केला होता. बॅनरवरील मजकुरात या पुलाच्या उद्घाटनला काॅमेडियन कुणाल कामरा याला आणणार असल्याचं उपाहासात्मकपणे म्हटले होते.
मनसेची ही खिजवणारी पोस्टरबाजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली. शिंदेंचे आमदार राजेश मोरे यांनी मनसे आणि राजू पाटील यांना जशात-तसे प्रत्यु्त्तर दिले आहे. आमदार मोरे यांनी सोशल मीडियावर एक एप्रिलला राजू पाटील आमदारांची शपथ घेणार असल्याचा मनसेच्या शेडो कॅबिनेटमध्ये निर्णय.., त्यांच्या शपथविधीला जगभरातील राष्ट्रीय अध्यक्ष कल्याणमध्ये येणार, असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
राजेश मोरे यांच्या या पोस्टला मनसे नेते राजू पाटील यांनी रिप्लाय करत संजय निरुपम यांचा एक जुना व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच आमदार झाल्याबरोबर निरुपमवर कारवाई करण्यासाठी तुमच्या जोडीने आंदोलन करणार असल्याबाबत पोस्टमध्ये म्हणत आमदार मोरे यांना टोला लगावला.
पलावा पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने मनसे आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली असली, तरी या पुलाचे काम कधी पूर्ण होणार याबाबत मात्र कुणीच बोलत नाही. आमचाच एप्रिल फुल झाला असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. एकंदरीतच एप्रिल फूलचे औचित्य साधत मनसे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकमेकांना लक्ष केलं गेलं. यातून फक्त राजकीय मनोरंजन झाले. मात्र या पुलाचे काम कधी होणार? वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार? याबाबत मात्र कुणीच ठोस सांगत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.