Uddhav Thackeray News : आरएसएसला नष्ट करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपवर खळबळजनक आरोप

INDIA Alliance PC : उद्धव ठाकरे म्हणाले, चार जूनला जुमला पर्व संपेल. इंडिया आघाडीचे सरकार येईल. आम्हाला हे नकली सेना म्हणतात ते उद्या आरएसएसला नकली संघ म्हणतील.
Narendra Modi Uddhav Thackeray
Narendra Modi Uddhav Thackeray Sarkarnama

Uddhav Thackeray : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष कमी ताकदवान होता तेव्हा आम्हाला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम आहोत, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी संघाला RSS नष्ट करतील अशी भीती व्यक्त केली आहे.

Narendra Modi Uddhav Thackeray
J P Nadda On RSS : 'संघा'ची पक्षाला गरज आहे का? नड्डा म्हणाले, 'आज भाजप मोठा झाला...'

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, चार जूनला जुमला पर्व संपेल. इंडिया आघाडीचे सरकार येईल. आम्हाला हे नकली सेना म्हणतात ते उद्या आरएसएसला नकली संघ म्हणतील. जे पी नड्डा J P Nadda यांची एक मुलाखत आली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की भाजप आता स्वयंपूर्ण झाला आहे. आता त्यांना संघाची गरज नाही. संघाला देखील हे नष्ट करून टाकतील. संघासाठी हे हे १०० वं वर्ष धोक्याच ठरेल. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी जन्म दिला. त्यालाच संपावयाची निघालेत.

'ते' देशद्रोही

आपल्या भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरे देशभक्त बंधू आणि भगिनी म्हणून करत आहेत. त्यावरून त्यांच्यावर टीका करत आहेत. 'हिंदू' शब्द ठाकरे टाळत असून ते हिंदू विरोधी असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. या टीकेला देखील ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जे देशभक्त शब्दावर आक्षेप घेतात ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही आहेत, असे ठाकरे म्हणाले.

बोटाला शाई

निवडणुकीत भाजपकडून पैशाचा वाटप होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या विषयी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे देखील ठाकरेंनी सांगितले. पैसे वाटपानंतर मतदानाच्या आधीच बोटाला शाई लावली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. पैसे घेणाऱ्यांनी मतदान करू नये यासाठी शाई लावली जात असल्याचे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com