NCP Politics : पवारांसोबतच्या बैठकीनंतर आव्हाड आणि राखी जाधव यांच्यासमोरच दोन गट भिडले

Lok Sabha Election : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीनंतर वाद...
Jitendra Awhad, Rakhi Jadhav
Jitendra Awhad, Rakhi JadhavSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मतदारसंघनिहाय चाचपणी केली जात असून अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पण या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांना भिडल्याचे दिसून आले.

बैठक संपल्यानंतर पक्षाच्या कार्यालयाबाहेरच दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व मुंबई अध्यक्षा राखी जाधव (Rakhi Jadhav) यांच्यासमोरच दोन गट समोरासमोर आले.

मुंबईमध्ये (Mumbai) शरद पवार गटाला ईशान्य मुंबई मतदारसंघ मिळावा, अशी मागणी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी केली, तर दुसरीकडे युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख मुंबईचे युवकचे अध्यक्ष नीलेश भोसले यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी केली. यावरूनच दोन गटांमध्ये वाद पाहायला मिळाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत बाजूला केले.

Jitendra Awhad, Rakhi Jadhav
Assembly Election : भाजपला दे धक्का; दहा दिवसांपूर्वीच शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा दारुण पराभव

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) हे आता मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी आज लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. 11 लोकसभा मतदारसंघांचा आढावा ते घेणार आहेत. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांनी आज मुंबईत 11 लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक बोलावली आहे. ईशान्य मुंबई, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली, जळगाव आणि रावेर या मतदारसंघांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर यंदाची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांनी पक्षांतर केल्यावर ही पहिली निवडणूक असणार आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्रित निवडणूक लढवायची झाली, तरीदेखील कोणाला किती जागा आणि कोणता पक्ष आपला उमेदवार देईल, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांसोबत बसून चर्चा करीत आहेत आणि आढावा बैठका घेत आहेत.

R...

Jitendra Awhad, Rakhi Jadhav
Bilkis Bano Case : महाराष्ट्र सरकारकडे बोट दाखवत सुप्रीम कोर्टाने गुजरातला झोडपले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com