Mumbai Mayor election: मुंबईचा सस्पेन्स संपला! दिल्लीचा 'फायनल' कॉल येताच शिंदेंच्या अडीच वर्षांच्या हट्टावर भाजपने फिरवला गेम! आता 'या' नावाची चर्चा जोरात

Eknath Shinde Shiv Sena News : भाजपने दिल्लीचा 'फायनल' कॉल येताच शिंदेंच्या अडीच वर्षांच्या हट्टावर गेम फिरवला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून महापौर पदावरून महायुतीधील भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सुरु असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीचे अडीच वर्ष महापौर पदावर दावा केला आहे. दुसरीकडे मात्र, भाजपने दिल्लीचा 'फायनल' कॉल येताच शिंदेंच्या अडीच वर्षांच्या हट्टावर गेम फिरवला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार असे दिसत आहे. त्यासाठी शिंदे सेनेतील काही नावाची चर्चा जोरात सुरु आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. सत्ता स्थापनेसाठी114 जागांचा आकडा गाठण्याची गरज आहे. भाजप (Bjp) आणि शिंदेसेनेचा एकत्रित आकडा 118 इतका आहे. 1997 ते 2022 अशी 25 वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर होता. एकसंध शिवसेना आणि भाजपची युती असताना सेनेकडे महापौरपद आणि भाजपकडे उपमहापौरपद अशी सत्तापदांची वाटणी व्हायची. मात्र, आता पहिल्यांदाच नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाचं गणित पहिल्यांदाच बदलणार आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
BJP News : निष्ठावंतांनी तोफ डागली; ‘भाजपचे पहिले कार्यालय सुरू केले, प्रतिकूल स्थितीतही पक्ष सोडला नाही अन्‌ आता आमचा बळी घेतला गेला’

एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) सेनेने महापौरपद अडीच वर्षांसाठी मिळावे, असा आग्रह शिंदेसेनेनं धरला. पण यासंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. यंदा भाजपनं शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला पहिल्यांदाच उपमहापौरपदावर समाधान मानावं लागेल. महापौरपद आपल्याकडे ठेवण्यावर भाजप अतिशय ठाम आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कालावधीत महापौरपद आपल्याकडे असावं, अशी शिवसेनेची इच्छा होती. त्यांनी यासंदर्भात मागणी करुन पाहिली. पण भाजपनं ही मागणी अमान्य केली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
NCP vs Shivsena : निवडणुकीनंतर पुण्यात राष्ट्रवादी अन् शिवसेनेतील हिंसाचार उफाळला, शिंदेंच्या नेत्याच्या अंगावर गाडी घातली, डोक्यात दगड अन्...

उपमहापौरपदासाठी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून समृद्धी काते, शैला लांडे, अश्विनी माटेकर यांची नावे चर्चेत आहेत. तृष्णा विश्वासराव, संध्या दोषी, अंजली नाईक यांच्या नावांचा विचार स्थायी समिती, शिक्षण समितीसाठी केला जाण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Bala Bhegde यांचं Rashtravadi Congress वर प्रहार।Sunil Shelke, Ajit Pawar, Mohol

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने मुंबईत 137 जागा लढवल्या. यातील 89 जागांवर त्यांनी विजय मिळवला. तर शिंदेसेनेनं 90 जागा लढवत 29 जागा जिंकल्या. शिंदेसेनेला अपेक्षित यश न मिळाल्यानं महायुतीला काठावरचं बहुमत मिळाले. शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना या थेट लढतीत शिंदेसेना मागे पडली. 44 प्रभागांमध्ये शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा सामना झाला. यातील 34 जागा ठाकरेंनी जिंकल्या. तर शिंदेंना केवळ 10 जागांवर यश मिळाले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
NCP Vs BJP : अजितदादांना भाजपवरची टीका महागात पडली? CM फडणवीसांनी पुणे-पिंपरी चिंचवडचा बदला रायगडमध्ये घेतला, भरत गोगावलेंना लॉटरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com