Sharad Pawar News: एनडीएच्या दिशेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं दुसरं पाऊल; आणखी एका महापालिकेत महायुतीला पाठिंबा

Mahayuti majority News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौर पदाची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. त्यातच गुरुवारी रात्रीतून मोठी घडामोड घडलीय आहे.
Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडणूक तोंडावर असताना मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौर पदाची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. त्यातच गुरुवारी रात्रीतून मोठी घडामोड घडलीय आहे. मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेतील पक्षीय बलाबल बदलणार आहे.

मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर 11 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मात्र याआधी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महापालिका निवडणुकीत मनसे (MNS) आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेतील चित्र बदलणार आहे.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
BJP News : भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेविकेला न्यायालयाचा दणका : पतीच्या कारभारामुळे थेट पदालाच स्थगिती

मुंबई महापालिकेववर गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेची (Shivsena) सत्ता होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 89 जागांसह भाजप मोठा पक्ष ठरला आहे. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Ajit Pawar News: अजित पवारांच्या निधनानंतर भाजपनं तडकाफडकी घेतलेला मोठा निर्णय, आता दादांचा 'तो' शेवटचा व्हिडीओ आला समोर

त्यातच आता ठाकरे बंधूंच्या सॊबत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेतील चित्र बदलणार आहे. विशेषता स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे समान संख्याबळ असेल असे वाटत होते. मात्र, त्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून काही नगरसेवकांची जुळवाजुळव केली जात होती.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Ajit Pawar News: अजित पवारांच्या निधनानंतर भाजपनं तडकाफडकी घेतलेला मोठा निर्णय, आता दादांचा 'तो' शेवटचा व्हिडीओ आला समोर

महापलिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युतीला काठावरचे बहुमत मिळाल्याने वैधानिक समित्यांवरील बहुमत डळमळीत झाले आहे. यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अन्य पक्षांतील नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत. हा पाठिंबा मिळाल्यास स्थायी समितीत ठाकरे यांच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचा एक सदस्य कमी होऊन सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढवण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांना गळाला लावत शिंदे यांच्या शिवसेनेची सरशी झाली आहे.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Sharad Pawar on Ajit Pawar Memorial: अजितदादांच्या स्मारकाबाबत शरद पवार म्हणाले, "ज्या जागेची चर्चा केली, त्या संस्थेचा मी..."

दरम्यान, आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या आधी शहर सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसतानाही त्यांनी खबरदारीचा पवित्रा घेत नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, असे निर्देश दिले आहेत.

Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray
Sharad Pawar on Ajit Pawar Memorial: अजितदादांच्या स्मारकाबाबत शरद पवार म्हणाले, "ज्या जागेची चर्चा केली, त्या संस्थेचा मी..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com