Dino Morea ED case : आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय डिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या; 'ईडी'ने उचललं मोठं पाऊल

ED Summons Dino Morea and 6 Others in Mumbai Mithi River Scam Linked to Shivsena MLA Aaditya Thackeray Aide : मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरियासह सात जणांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले.
Mumbai river project corruption
Mumbai river project corruptionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai river project corruption : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय, अशी ओळख असलेल्या अभिनेता डिनो मोरियाच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर आता चौकशीसाठी समन्स बाजवण्यात आलं आहे.

डिनो मोरियासह सात जणांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलवले आहे. पुढील आठवड्यात ही चौकशी होणार आहे.

मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून घोटाळ्यात डिनो मोरिया याच्या घरी दोन दिवसांपूर्वी, शुक्रवारी ईडीने छापा घातले होते. याचवेळी 'ईडी'ने मुंबई (Mumbai) आणि केरळमधील कोची, त्रिसूर इथल्या एकूण 18 ठिकाणांवर छापे घातले. त्यात दिनो मोरया, त्याचा भाऊ सँटीनो यांच्यासह घोटाळ्यात सहभाग स्पष्ट झालेले महापालिकेतील अधिकारी प्रशांत रामगुडे, कंत्राटदार भूपेंद्र पुरोहित, कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्विसेस कंपनी, आरोपी मध्यस्थ जय जोशी, केतन कदम यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांचा समावेश होता.

'ईडी'ने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत अनेक डिजिटल उपकरणे, महत्वाची कागदपत्रे आणि सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच 22 बँक (Bank) खाती आणि डिमॅट खाते गोठविण्यात आले. कारवाई एकूण सव्वा कोटीहून अधिक मूल्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील घोटाळ्याचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील सुरू आहे.

Mumbai river project corruption
Shrirampur politics : मुरकुटेंमधील जुना शिवसैनिक जागा झाला; अहिल्यानगरमधील मेळावा टाळल्यानं गटबाजीची 'ठिणगी'

रामगुडे यांच्यासह तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार कंपन्या, तीन मध्यस्थ - दलाल आणि मॅटप्रॉप कंपनीच्या दोन प्रमुखांवर गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासात या आरोपींनी संगनमताने 65 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे हाती लागल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. त्यातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास 'ईडी'कडून सुरू आहे.

Mumbai river project corruption
Maharashtra Political Live Update : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरेंचा दुजोरा

दोषींवर कारवाई होणार

मिठी नदीतील भ्रष्टाचारात दोषींवर कारवाई झाली पाहिजे; परंतु आम्ही कोणावरही सूडभावनेने कारवाई करणार नाही. परंतु ज्यांनी पाप केले आहे, ते झाकले जाणार नाही. दोषींची नावे लवकरच बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com