Mumbai Municipal Bank Election : 'बेस्ट'नंतर ठाकरेंचा पुन्हा एकदा पराभव, प्रवीण दरेकरांनाही मोठा धक्का!

Uddhav Thackeray Pravin Darekar : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर झालेल्या म्युनिसिपल बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Srakarnama
Published on
Updated on

Bank Election : नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंचा पराभव झाला. इतर वेळा बँकांच्या निवडणुका चर्चेत नसतात मात्र आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक आणि संभाव्या ठाकरे बंधुंच्या युतीमुळे या निवडणुका चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे बेस्टमधील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित नेत्यांना मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या म्युनिसिपल को-ओपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

विशेष म्हणजे हे नेते भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित जय सहकार पॅनेलमध्ये सहभागी होते. जय सहकार पॅनलच्या सर्वाधिक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला असून विष्णू भोईर, किरण आव्हाड यांच्या सहकार पॅनलने विजय मिळवला आहे. या बँकेची सत्ता दरेकर यांच्याशी संबंधित प्रस्थापित पॅनलच्या हातात होती.

गुणरत्न सदावर्ते यांची ऐनवेळी माघार

गुणरत्न सदावर्ते देखील ही निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, मात्र अंतिम क्षणी त्यांनी माघार घेतल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. प्रहारचे बच्चू कडू यांच्याशी संलग्न पॅनल आणि प्रवीण दरेकरे यांच्या संबंधित पॅनलमध्येच खरी लढत होती. मात्र, दरेकरांना मोठा धक्का बसत जय सहकार पॅनेलचे केवळ पाच उमेदवार विजयी झाले. तर, उर्वरीत सर्व उमेदवार हे सहकार पॅनेलचे विजयी झाले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे पदाधिकारी प्रदीप सावंत यांचा पराभव झाला.

Mumbai Municipal Corporation
MNS Politics : 'लाव रे तो व्हिडिओ, नव्हे काढ रे तो फोटो'; राज ठाकरेंनी पुण्यात राबवला नवा पॅटर्न!

तब्बल साडेपाच हजार कोटींची उलाढाल

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या या बँकेची उलाढाला तब्बल साडेपाच हजार कोटींच्या आसपास आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त हे बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर, बँकेच्या संचालक मंडळात तब्बल 19 संचालक असतात. या संचालक पदासाठीच निवडणूक होत असते.

Mumbai Municipal Corporation
PMC Election : कुठे दिग्गजांना धक्का तर कुठे युतीतील नेते आमने-सामने, पुण्यातील प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com