Sarkarnama Exclusive Interview: 20 वर्षांनंतर एकत्र येण्याचा फायदा कुणाला होणार? राज की उद्धव ठाकरेंना.. फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis ON Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंद सर्वांना झाला आहे.त्यांना एकत्र येण्यासाठी २० वर्षे लागली. मराठी आणि मुंबईच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा कुणाला होणार राज की उद्धव ठाकरेंना? याचे उत्तर फडणवीसांनी दिले.
Devendra Fadnavis,  Raj Thackeray
Devendra Fadnavis, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत. हे दोघे भाऊ एकत्र यावेत यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला २० वर्षे वाट का पाहावी लागली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी याचा फायदा कुणाला होणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट या कार्यक्रमात बोलत होते. संपादक निलेश खरेंच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.

ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंद सर्वांना झाला आहे.त्यांना एकत्र येण्यासाठी २० वर्षे लागली. मराठी आणि मुंबईच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. आता ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा कुणाला होणार राज की उद्धव ठाकरेंना? याचे उत्तर फडणवीसांनी दिले.

'राज-उद्धव एकत्र आले त्याचा फायदा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल, पण या ठाकरेसेना-मनसे युतीचा फायदा राज ठाकरे यांना होणार नाही,' असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis,  Raj Thackeray
Pune Police: गुंड गजा मारणे पोलिसांच्या रडावर: पुण्यालगतच्या गावात बसून फिरवतोय फोन, नेमका प्लॅन काय?

ठाकरे सेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला होता. मुंबईच्या न सुटलेल्या प्रश्नावर राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, 'मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, मुंबईचे प्रश्न अडचणी समजण्यासाठी मुंबईत जन्माला यावे लागते,' असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. त्यावर फडणवीसांनी पलटवार केला आहे.

तुम्ही इतके वर्षे मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले? याचा उत्तर द्यावे, असा सवाल फडणवीस यांनी राज ठाकरे यांना केला. मुंबईच्या विकासाची सुरूवात नागपूरकर गडकरींमुळेच झाली. आम्ही मुंबईत जन्माला आलो नाही, हा आमचा दोष नाही, असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com