BMC Nivadnuk 2026: महायुतीचा मास्टरप्लॅन! मुंबई जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांची फौज

Mumbai Municipal Election 2026 : मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली आहे. उत्तर भारतीयासाठी भाजपने मास्टरप्लॅन आखला आहे. वॉर्डमध्ये भाजपकडून या स्टार प्रचारांची रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Mumbai Municipal Election 2026
Mumbai Municipal Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

BMC Election 2025: राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. 15 जानेवारीला निवडणुका होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. महापालिकेच्या रणसंग्रमात विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने आतापासूनच कंबर कसली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुहुआ आणि रवी किशन यांना प्रचारात सहभागी करून घेणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

विशेषत: मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली आहे. उत्तर भारतीयासाठी भाजपने मास्टरप्लॅन आखला आहे. वॉर्डमध्ये भाजपकडून या स्टार प्रचारांची रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील आपल्या नेत्यासह अभिनेता गोविंदा यांना प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

शिंदेसेनेने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार, खासदार, मंत्री यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे.

गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत , शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर आदीसह 40 जण शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे.

आगामी काळात राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांमध्ये स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा, कोपरा सभा आणि थेट जनसंपर्क मोहिमा राबविण्यात येणार आहेत. या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून महायुतीने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

Mumbai Municipal Election 2026
Sharad Pawar News: शरद पवारांचा पक्ष आघाडीतून बाहेर; स्वाभिमानाची लढाई लढू या! कोल्हापुरात 'लेटर बॉम्ब' टाकला...

दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल (ता.२६) जाहीर होणार होती. अनेक ठिकाणच्या नावांवर एकमत न होणे, बंडखोरी होण्याची शक्यता यामुळे भाजपने यादी जाहीर करण्याचे टाळले आहे. पण ज्यांच्या नावांवर मुंबईतील बैठकीत एकमत झाले आहे अशा उमेदवारांना तुम्ही अर्ज भरण्याची तयारी करा, असे निरोप महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असा चंग भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं बांधला आहे. तर अजित पवारांना बाजूला ठेवून युती करणाऱ्या या दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजप 140 तर शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार असल्याचं समजते. जेवढ्या लवकर उमेदवारांची यादी जाहीर करू तेवढी बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आता भाजप आणि शिवसेना उमेदवारांची यादी आज रात्री किंवा उद्या दुपारी जाहीर करणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com