Annamalai On Raj Thackeray Challenge : 'मी मुंबईत येणारच… हिंमत असेल तर अडवा!' अण्णामलाईंचं ठाकरेंना थेट आव्हान

Mumbai Municipal Election: BJP Leader K Annamalai Challenges Raj & Aaditya Thackeray : तमिळनाडू इथले भाजपचे के. अण्णामलाई यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
Annamalai On Raj Thackeray Challenge
Annamalai On Raj Thackeray ChallengeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Election : मुंबईवरील विधानावरून राज ठाकरे आणि तमिळनाडूमधील भाजपचे के. अण्णामलाई यांच्यात वाॅर सुरू झाला आहे.

राज ठाकरे यांच्या टीकेनंतर के. अण्णामलाई यांनी, 'मला मुंबईत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी मुंबईत येणारच. हिंमत असेल तर माझे पाय तोडून दाखवा,' ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यामुळे भाजपविरुद्ध ठाकरे बंधू यांचा संघर्ष महापालिका मतदानाच्या एक दिवस अगोदर अधिक उफाळला आहे.

तमिळनाडूमधील भाजपचे (BJP) के. अण्णामलाई यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे म्हटलं होतं. ठाकरे बंधूंची मुंबईत महापालिका निवडणुकीनिमित्ताने प्रचार सभा झाली. मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांनी भाषणात के. अण्णामलाई यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाकरे यांनी अण्णामलाई यांना ‘रसगुल्ला’ असे संबोधले आणि मुंबईच्या प्रश्नांवर बोलण्याचा अण्णामलाई यांना काही अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते, ‘‘एक रसगुल्ला तमिळनाडूमधून आला. तुझा इथल्या गोष्टींशी काय संबंध? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी,’’ असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या 1960-70 च्या दशकातील घोषणेचा उल्लेख केला.

Annamalai On Raj Thackeray Challenge
Eknath Shinde Shiv Sena news : माजी महापौराच्या घरावर छापा! विपरीत घडलं, पतीला जबर धक्का; अहिल्यानगरसाठी एकनाथ शिंदे थेट ‘अ‍ॅक्शन मोड’वर...

राज ठाकरे यांच्या या टीकेला तमिळनाडूतील भाजपचे के. अण्णामलाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘‘माझ्या मुंबईबाबतच्या वक्तव्यावर टीका करणारे फक्त अज्ञानी आहेत. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे मला धमकावणारे कोण? मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्यांनी फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा घेतल्या आहेत. मला मुंबईत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी मुंबईत येणारच. हिंमत असेल तर माझे पाय तोडून दाखवा,’’ असे आव्हान अण्णामलाई यांनी दिले आहे.

Annamalai On Raj Thackeray Challenge
Raveena Tandon ShivsenaUBT : रवीना टंडन मैदानात! ठाकरे सेनेच्या 'मशाली'चा करतेय जोरदार प्रचार...

अण्णामलाई पुढे म्हणाले, ‘‘मुंबईला तिहेरी इंजिन सरकाराची गरज आहे. मुंबईत भाजपचा महापौर हवा, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत. मुंबई हे जागतिक महानगर आहे. बंगळुरूचा अर्थसंकल्प 19000 कोटी आहे, तर चेन्नईचा 8000 कोटी आहे. वित्तीय व्यवस्थापनासाठी प्रशासनात चांगले लोक असायला हवेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, हे सर्वांना माहिती आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com