BJP Mumbai Victory: ठाकरे बंधूंच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण आले समोर; यामुळे गमावली मुंबई

Political News : महापालिका निवडणुकीत मोठ्या फरकाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेला पराभव स्वीकारावा लागला.
Uddhav Thackeray & Raj Thackeray
Uddhav Thackeray & Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या एकसंध शिवसेनेचा पराभव करीत भाजपने इतिहास रचला आहे. महापालिका निवडणुकीत मोठ्या फरकाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेला पराभव स्वीकारावा लागला. भाजपने महायुती करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेत मुंबईत मोठा विजय मिळवला आहे. मुंबईतील मतमोजणी सुरु असलेली तरी आतापर्यंतचा निकालाचा ट्रेंड पाहता महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरु केली असतानाच ठाकरे बंधूंच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे. यामुळेच त्यांना मुंबईची सत्ता गमावल्याचे पुढे आले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने (BJP) शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करताना त्यांच्या विरोधातील मताचे मोठ्या प्रमाणात विभाजन केले. ठाकरे बंधू, काँग्रेस-वंचित आघाडी, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप विरोधातील मताचे विभाजन करण्यात यशस्वी झाले. त्याचा फटका ठाकरे बंधूंच्या युतीला बसला.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Congress Historic Victory : भाजपचे महापालिकेत बहुमताचे स्वप्न भंगले? अपक्ष नगसेवकांच्या पाठिंब्यासाठी धावाधाव

त्यासोबतच या निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित आघाडी झाली. त्याचा फटका ठाकरे बंधूंच्या पक्षाला बसला आहे. काही जागाचा निकाल पाहता भाजपने ज्या ठिकाणी विजय मिळवला आहे. त्याठिकाणी काँग्रेस (Congress)-वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेल्या मतामुळे ठाकरे बंधूंचा पराभव झाला असल्याचे आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पराभवासाठी काँग्रेस-वंचित आघाडीने घेतलेले मतदान कारणीभूत ठरले आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
NCP News : भाजपच्या लाटेत शरद पवारांचा शहराध्यक्ष पराभूत; अजितदादांच्या राष्ट्रवादीचीही निराशजनक कामगिरी

मुंबईत उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांची मोठी अपेक्षा होती, मात्र एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने अनेक प्रभागांत उमेदवार उभे केल्याने या मतांचे विभाजन झाले, ज्याचा थेट फायदा महायुतीला झाला. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. वरच्या पातळीवर नेत्यांची युती झाली, तरी खालच्या पातळीवर मनसे आणि शिवसेना यांच्यात मतांचे हस्तांतरण होऊ शकले नाही. त्याचा फटका ठाकरे बंधूना या निवडणुकीत बसला आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
BJP-Shivsena News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपच मोठा भाऊ, युती तोडल्याचा शिवसेनेला फटका!

भाजपची 'मायक्रो-प्लानिंग' रणनीती

भाजपने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात 'पन्ना प्रमुख' आणि बूथ स्तरावर प्रचंड बांधणी केली होती. विशेषतः गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांचे एकत्रीकरण करण्यात भाजपला यश आले, ज्याचा मुकाबला ठाकरे बंधू करू शकले नाहीत.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरेंच्या हक्काच्या 'मराठी कार्ड'ला सुरुंग लावला. विकासकामे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेने मध्यमवर्गीय मराठी मतदारांना आपल्याकडे खेचले. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
NCP News : भाजपच्या लाटेत शरद पवारांचा शहराध्यक्ष पराभूत; अजितदादांच्या राष्ट्रवादीचीही निराशजनक कामगिरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com