

Shambhuraj Desai latest news : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर्स सुरू करण्यावरून इशारा दिला आहे. हे सेंटर कुठेही उभं केलं तरी फोडून टाकणार, असा खणखणीत इशारा दिला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी राज ठाकरेंना ठणकावणारी प्रतिक्रिया दिली आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, "राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नमो पर्यटन संकल्पना ही समजून घ्यायला हवी. आम्ही गडकिल्ल्यांवर नाही, तर किल्ल्यांच्या पायथ्याला नमो पर्यटन केंद्र उभे करणार आहोत. राज ठाकरे यांनी केलेली टीका ही अपुऱ्या माहितीच्या आधारे असून त्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलावे."
'एका वर्षापूर्वी ठाणे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज त्यांच्याच नावाने सुरू होणाऱ्या एका योजनेवर टीका करणे म्हणजे, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे,' असा टोलाही मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
'याशिवाय सरकारने कोणतेही उभं केलेलं काम तोडफोड करण्याचा, कोणत्याही घटकाने प्रयत्न केल्यास सरकार काय हाताची घडी घालून गप्प बसणार नाही,' असा इशारा देखील शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता दिला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेचा मलिदासमोर दिसत असल्याने ते आता एकत्र आले आहेत. दोन विरुद्ध बाजूला टोक असणारी लोक केवळ पालिकेतील सत्तेसाठी एक झाली असून आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून मुंबई पालिकेतील मलिदा खाऊ, अशी भावना या दोघांची आहे, असा टोला देखील शंभूराज देसाई यांनी लगावला.
मात्र विकासाचे व्हिजन असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीलच महापौर मुंबई महापालिकेत बसेल, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अख्यारितील खात्याने अध्यादेश काढून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, राजगडावर टुरिझम सेंटर्स काढतंय, त्याला नाव दिलं आहे नमो टुरिझम सेंटर्स. जिथं केवळ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलं पाहिजे, तिथं नरेंद्र मोदींच्या नावाची सेंटर्स कशासाठी? मी आत्ताच सांगतो, सत्ता असो किंवा नसो, हे सेंटर कुठेही उभं केलं, तरी फोडून टाकणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.