Mumbai-Pune Expressway : एक्स्प्रेस वे नंतर आता जुन्या मुंबई-पुणे मार्गावरही 'टोलधाड' : सामान्यांचा प्रवास महागला..

Pune Mumbai News : वाहनचालक-प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री...
Mumbai-Pune Expressway :
Mumbai-Pune Expressway :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सरकारने टोलधाड टाकली आहे. कारण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलमध्ये (Mumbai Pune Toll Tax) येत्या एक एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे वृत्त आले होते. यानंतर लोकांमध्ये नाराजी पसरली. आता पुढची माहिती समोर येत आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे नंतर आज जुन्या मुंबई-पुणे महामार्वगावर सुद्धा टोल वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. एक एप्रिलपासून जुन्या पुणे मुंबई मार्गावरील टोलमध्ये सुद्धा १८ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्ग व तसेच जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरून दोन्ही कडे प्रवास महागणार आहे. याचा मोठा भुर्दंड वाहनचालक आणि तसेच प्रवाशांना बसणार आहे.

Mumbai-Pune Expressway :
Girish Bapat News : गिरीश बापट अनंतात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

एक एप्रिलपासून खासगी वाहन चालकांना 95 किमी लांबीच्या द्रुतगती मार्गावर एकेरी टोल म्हणून 320 रुपये द्यावे लागतील. सध्या हा टोल 270 रुपये इतका आहे. पुणे ते मुंबईच्या परिसरात जाण्यासाठी कार चालकांना 360 रुपये (एक्स्प्रेसवेवर 320 रुपये आणि वाशीजवळ 40 रुपये) मोजावे लागणार आहेत.टेम्पो वाहनाचा टोल 420 वरून 495 पर्यंत वाढेल. ट्रकसाठी 580 ऐवजी 685 रुपये आकारले जाणार आहेत.

Mumbai-Pune Expressway :
Shinde Fadnavis Govt : हिंदू जनआक्रोश मोर्चावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अक्षरशः झापलं !

बस वाहनासाठी आता 797 रुपयांऐवजी 940 रुपये टोल भरावा लागणार आहे. टोल शुल्क वाढल्याने मुंबई आणि पुण्याच्या मार्गावरील टॅक्सी आणि बसचे भाडेही वाढू शकतात. वाढीव टोल शुल्काचा बोजा बस आणि टॅक्सी चालकांवर पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com