Pune News : पुणे शहराला निश्चित करून दिलेल्या पाणी कोट्याच्यापेक्षा अतिरिक्त आठ टीएमसी पाणी पुणेकर वापरत असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. हे अतिरिक्त पाणी कोणत्या कारणामुळे वापरले जात आहे. या गोष्टींचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याच्या सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यामधील बैठकीप्रसंगी दिल्या आहेत.
जलसंपदा मंत्री सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी महापालिकेतील पाणी वापराबाबत बैठक घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Wikhe Patil) म्हणाले, 'पुणे शहरामध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर होत आहे. त्यामुळे सिंचनावर परिणाम होत असून दौंड, इंदापूर पुरंदर भागातील शेतीला पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या संदर्भात महापालिके अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे.
सध्या स्थितीला पुणे शहरात 22 टीएमसी पाण्याचा वापर केला जात आहे, पुणे शहराची लोकसंख्या पाहता पुणे शहराने फक्त 14 टीएमसी पाणी वापरणे अपेक्षित आहे. असे असताना देखील अतिरिक्त आठ टीएमसी पाणी पुण्यात वापरले जात आहे.
पुणे शहरातून तयार होणाऱ्या सांड पाण्यापैकी 80 टक्के पाणी रिसायकल करून ते शेतीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना फक्त 30 टक्केच पाणी रिसायकल केले जात आहे. त्यामुळे एसटीपी प्लांट वाढवून जास्तीत जास्त पाण्याचा रिसायकलिंग करण्याबरोबरच पाण्याची होणारी गळती देखील थांबवण्याबाबत महापालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरात जवळपास 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची टास्क फोर्स नेमण्यात येणार असून सर्वे करून गळतीची कारणे शोधण्यात येणार आहे. तसेच शहरात अतिरिक्त पाण्याचा वापर कोणत्या कारणामुळे होतोय याचा देखील या टास्क फोर्सच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे.
महापालिकेने अद्याप पाटबंधारे विभागाला 722 कोटीची थकबाकी देणे आवश्यक आहे. त्याबाबत देखील दोन्ही विभागांच्या संयुक्त बैठका घेऊन त्यावरती तोडगा काढण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. त्यासोबतच टाटाच्या धरणाच्या माध्यमातून अतिरिक्त दहा टीएमसी पाणी हे वाढत्या पुण्यासाठी आणि लगतच्या शेतीसाठी मिळणार आहे. त्यासोबतच नदी परिसरातील अतिक्रमणाचा शोध घेण्यासाठी ड्रोन सर्वे करण्यात येणार असून त्यानंतर ही सर्व अतिक्रमण तातडीने हटवण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.