

Mumbai News : मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यात येत आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासोबतच नव्या झोपडपट्ट्या निर्माण होऊ नयेत यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यासोबतच येत्या काळात पायाभूत सुविधांसोबत परवडणाऱ्या घरांनाही सरकारने प्राधान्य दिले आहे. २०३० पर्यंत ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 35 लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही शिंदे म्हणाले.
येत्या काळात मुंबई आणि एमएमआरमधील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन नवीन गृहनिर्माण धोरण लागू करण्यात आले आहे. 2030 पर्यंत ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण आणि हवामान बदलाचा विचार केंद्रस्थानी
राज्यात मोठ्या किनारपट्टीचा, विविध भौगोलिक परिस्थितीचा आणि वेगाने विकसित होण्यासाठी हवामान बदलाचे आव्हान गंभीर आहे. त्यामुळे विकासाचे नियोजन करताना पर्यावरण आणि हवामान बदलाचा विचार केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या हवामान कृती आराखड्यातही शाश्वत विकासासाठी अनुकूलन आणि उत्सर्जन कमी करण्याच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईसारख्या किनारी शहरात वाढती उष्णता, पूर, समुद्रपातळीतील वाढ आणि प्रदूषण यांसारख्या आव्हानांना सामोरे जाताना फ्लड कंट्रोल, कोस्टल प्रोटेक्शन, हरित क्षेत्र वाढविणे, रेनवॉटर मॅनेजमेंट, शाश्वत वाहतूक आणि तंत्रज्ञानाधारित नियोजनावर भर दिला जात आहे, असे शिंदे यांनी म्हणाले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तरुणांना संधीच्या शोधात राज्याबाहेर जावे लागू नये, यासाठी राज्यातच उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. विकसित महाराष्ट्राशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्यांसाठी आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल महाराष्ट्र घडविणे हेच आमचे ध्येय आहे, असेही शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.