Teachers News : शिक्षकांची वेतन थकबाकी रखडली, शिक्षक परिषद आक्रमक; थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव!

Teachers Council CM Devendra Fadnavis : महापालिका क्षेत्रातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांना मात्र सप्टेंबर २०२३ पासून थकबाकीविना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.
a teachers demand the release of pending Seventh Pay Commission arrears as the Teachers' Council approaches Chief Minister Devendra Fadnavis.
a teachers demand the release of pending Seventh Pay Commission arrears as the Teachers' Council approaches Chief Minister Devendra Fadnavis. Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : बृहन्मुंबई महापालिका अनुदानित प्राथमिक शाळांमधील तब्बल ३,५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. जानेवारी २०१६ पासूनची वेतन थकबाकी मिळण्याची प्रतीक्षा असताना महापालिका योग्य कार्यवाही करत नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे महापालिकेतील प्राथमिक शिक्षकांना २०१७ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ थकबाकीसह मिळत आहे, तर दुसरीकडे त्याच महापालिका क्षेत्रातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांना मात्र सप्टेंबर २०२३ पासून थकबाकीविना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. हा दुजाभाव नेमका कशासाठी, असा संतप्त सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्य शासनाकडून मिळणाऱ्या ५० टक्के अनुदानाची प्रतिपूर्ती प्रलंबित असल्याचे कारण देत मुंबई महापालिकेने अनुदानित शाळांतील शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखून धरली आहे. महापालिका प्रशासनाच्या २५ मे २०२३च्या मंजुरीनंतर सप्टेंबर २०२३ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र, जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान प्राप्त झाल्यानंतरच अदा करता येईल, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याचे संबंधित परिपत्रकातून स्पष्ट होते.

अनुदानित शाळांतील शिक्षकांनीही तेवढ्याच निष्ठेने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. मग त्यांच्या हक्काच्या वेतनासाठीच आर्थिक अडचणींचे कारण का पुढे केले जात आहे, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबईचे कार्यवाह तथा माजी महापालिका शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

अनुदानाचे कारण पुढे...

राज्य शासनाच्या २० जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग महापालिकेने स्वनिधीतून लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने प्रथम खर्च करून त्यानंतर राज्य शासनाकडून खर्चाची प्रतिपूर्ती करून घ्यायची असल्याची भूमिका शिक्षण विभागाने मांडली आहे. मग प्रत्यक्ष थकबाकी देण्याच्या वेळी अनुदानाचे कारण पुढे करून शिक्षकांना प्रतीक्षेत का ठेवले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

a teachers demand the release of pending Seventh Pay Commission arrears as the Teachers' Council approaches Chief Minister Devendra Fadnavis.
Dawood Ibrahim News : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित इमारतीवर BMC ची बुलडोझर कारवाई; मशिदही पाडली जाणार?

थकबाकी अदा करण्याचे आदेश द्यावेत

शिक्षक परिषदचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, यापूर्वीही विविध शिक्षक संघटनांनी महापौर, उपमहापौर, शिक्षण समिती अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून तसेच बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला; मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालून जानेवारी २०१६ पासूनची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याचे आदेश द्यावेत.

तातडीने निर्णय घेण्याची मागणी

शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष आनंत पवार यांनी सांगितले की, मुंबईतील शिक्षकांना शासनाकडून आश्वासन नको, तर हक्काची थकबाकी हवी, राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांनी एकमेकांकडे बोट दाखवणे थांबवून शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांना तातडीने न्याय द्यावा, हीच आता शिक्षकांची अपेक्षा आहे. तरच हा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे.

a teachers demand the release of pending Seventh Pay Commission arrears as the Teachers' Council approaches Chief Minister Devendra Fadnavis.
BMC News : आधी दिया मिर्झांना विरोध, आता सुरक्षित दिवाळीचा सल्ला! वारिस पठाणांनी रितू तावडेंना सुनावले; म्हणाले, 'आता जाग आली का?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.