Mumbai Terror Attack Plot : मुंबईत दहशत हल्ल्याचा मोठा कट उधळला! ISI-दाऊद कनेक्शन उघड; पोलिस अन् सुरक्षा दल होतं टार्गेटवर

Delhi Police bust major terror conspiracy linked ISI and Dawood network; Mumbai police and security forces were target list : वांद्रेतील गरीब नगर कारवाईचा बदला घेण्याचा कट, समोर आला असून, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या नऊ जणांपैकी दादर रेल्वे पुलासह अनेक ठिकाणांची रेकी केल्याचा तपासात समोर आले आहे.
Mumbai Terror Attack Plot
Mumbai Terror Attack PlotSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Security Alert : मुंबईत पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित हस्तक आणि स्थानिक संशयित यांच्या संगनमतातून हा कट रचला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कुर्ल्यातील साजिद मेहबूब शेख उर्फ अरबाझ खान आणि मुंब्य्रातील तौकीर रिझवान शेख यांचा समावेश आहे. या दोघांना 27 मे रोजी अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये एका नेपाळी नागरिकाचाही समावेश आहे. दिल्ली, मुंबई (Mumbai) आणि देशातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी घातपात घडवून आणण्याचा त्यांचा कट असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

तपासानुसार, वांद्रे येथील गरीब नगर परिसरात 19 ते 23 मेदरम्यान झालेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये (Police) संघर्ष झाला होता. त्यात काही पोलिसांसह दहा जण जखमी झाले होते.

Mumbai Terror Attack Plot
Sex Determination Case : महाराष्ट्र हादरवणारं गर्भलिंग निदान रॅकेट! 12वी शिकलेल्याकडून चाचण्या, गोठ्यापासून धावत्या कारपर्यंत ‘सेटअप’, IMA डॉक्टरसह 12 जण अटकेत, शेकडो गर्भपात

याच घटनेचा आधार घेत संशयितांनी गरीब नगर परिसराची रेकी केली. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाकिस्तानातील हस्तकांकडे पाठविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कारवाईत सहभागी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह हिंदू समाजातील काही व्यक्तींना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Terror Attack Plot
Doctor Controversy : ‘बाबासाहेबांवर आक्षेपार्ह पोस्ट’; संतप्त भीमसैनिकांचा डॉक्टरला धडा, तोंडाला शाई फासत चपलांचा हार

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आयएसआयशी संबंधित घटक, पाकिस्तानातील गुंड शाहजाद भट्टी, यावर खान आणि दाऊद टोळीतील छोटा शकीलचा निकटवर्तीय मुन्ना झिंगाडा यांनी हा कट रचल्याचा संशय आहे. हुझैफा नावाच्या एका हस्तकाने स्थानिक तरुणांना जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली असून तो सध्या फरार आहे.

अरबाझ खान आणि तौकीर शेख यांनी दादर रेल्वे पुलासह मुंबईतील अनेक संवेदनशील ठिकाणांची पाहणी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्या मोबाईल फोनमधून विविध ठिकाणांचे व्हिडिओ, पाकिस्तान आणि दुबईतील संपर्कांशी झालेल्या चॅट्स तसेच व्हॉइस नोट्स जप्त करण्यात आल्या आहेत.

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांना हातबॉम्ब हल्ले घडवून आणणे, पोलिस आणि सुरक्षा दलांवर हल्ले करणे तसेच मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मुन्ना झिंगाडा मुख्य सूत्रधार?

या कटामागे कराचीमध्ये बसून कार्यरत असलेला मुन्ना झिंगाडा हा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तोच संपूर्ण कारवाईचे नियंत्रण करत होता, असा तपासाचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विशेष म्हणजे, 2000 साली बँकॉकमध्ये छोटा राजनवर झालेल्या हल्ल्यातही मुन्ना झिंगाडाचा सहभाग असल्याची नोंद आहे. त्या प्रकरणात त्याने तब्बल 17 वर्षे थायलंडच्या तुरुंगात शिक्षा भोगली होती.

चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आयएसआयशी संबंधित मॉड्यूलमध्ये सक्रिय असलेल्या चार आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हरविंदरसिंग, गगनदीपसिंग, मनजितसिंग आणि अंग कामी लामा या चौघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com