Kisan Kathore : मोठी बातमी : भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घराबाहेर गोळीबार, एक जण जखमी

Kisan Kathore : मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घराबाहेर दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्ती जखमी झाला असू त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Police cordon off the area after a daylight firing outside BJP MLA Kisan Kathore’s house in Murbad; one injured in the attack.
Police cordon off the area after a daylight firing outside BJP MLA Kisan Kathore’s house in Murbad; one injured in the attack.Sarkarnama
Published on
Updated on

Kisan Kathore : मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घराबाहेर दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्ती जखमी झाला असू त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अल्ताफ शेख असे या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात झाली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर गावातील बोराडपाडा रस्त्यावर किसन कथोरे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाहेर बदलापूर गाव ते बोराडपाडा असा रस्ता आहे. याच रस्त्यावर गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान, एका टोळक्याने अल्ताफ शेख याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शेख याच्या पाठीमागे खांद्यावर गोळी लागली. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले. तर अल्ताफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करून काही तासातच एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्ताफ शेखचे एका टोळीसोबत जागेवरून वाद सुरू होते. गुरुवारी हा वाद पराकोटीला गेला आणि गोळीबार झाला. अल्ताफवर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच संशय आरोपीवरही 3 गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे असे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.

Police cordon off the area after a daylight firing outside BJP MLA Kisan Kathore’s house in Murbad; one injured in the attack.
Uddhav-Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप-शिंदेंना धसका... घाम फोडणारा मुंबईचा अंदाज समोर!

मोहन राऊत हत्या प्रकरणाची आठवण :

ही घटना केवळ आमदार किसन कथोरे यांच्या घराबाहेर घडली. प्रत्यक्षात त्यांना इजा पोहचवण्याचा उद्देश नसल्याचे समोर आले. पण या प्रकणानंतर बदलापूरकरांना शिवसेनेच्या मोहन राऊत हत्याकांडाची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी राऊत यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com