

वसई : 13 मार्च | नालासोपारा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी ( Shyam Pendhari News ) यांचा बुधवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाती मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ट्रकनं पेंढारी यांच्या कारला समोरून धडक दिली. दोन्ही वाहनं एकमेकांवर आदळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात श्याम पेंढारी यांचा मृत्यू झाला. ते 58 वर्षांचे होते.
बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास श्याम पेंढारी हे कारमधून ( MH 02. GB 935 ) मुंबईवरून नालासोपाऱ्याच्या दिशेने येत होते. सध्या महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी असते. त्यामुळे पेंढारी हे विरुद्ध दिशेने कारमधून जात होते, तर आयशर ट्रक ( DD 03. R. 9092 ) मुंबईच्या दिशेने येत होता. तेव्हा मालजीपाडा येथे लोढा धामशेजारी आयशर ट्रक आणि पेंढारी यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. यात पेंढारी आणि कारमधील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अपघातानंतर पेंढारी आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी मीरा रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित ( Shyam Pendhari Passes Away ) केलं. नायगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्याम पेंढारी यांच्या पत्नी जया पेंढारी यादेखील वसई-विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.