'अग्निवीरांना आगित जाळण्याचे पाप भाजप करत आहे!'

अग्निपथ योजनेवरुन नाना पटोले (Nana Patole) यांची भाजपवर (BJP) टीका
Agnipath Scheme
Agnipath Scheme Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अग्निपथ योजनेवरुन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेत आले. त्यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) माध्यमातून स्वत:चीच पाठ थोपठून घेत विश्वगुरु झाले. त्यामुळे ते आता अग्निपथ अशा योजना आणत आहेत. उद्योगीक मित्रांना वीर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. देशाच्या सुरक्षेमध्ये या पद्धतीचा हस्तक्षेप पहिल्यांदा पाहिला आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. (Nana Patole Latest Marathi News)

Agnipath Scheme
'मविआचे सर्व उमेदवार विजयी होणार; मतांची जुळवा-जुळव पूर्ण!'

आज तिनही दलाच्या प्रमुखांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या ते कोणत्या पद्धतीने सांगत आहेत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे माहित नाही. त्यांनाही माहिती आहे की सैन्यामध्ये अशा पद्धतीने भरती होत नाही. ज्या पद्धतीने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीष माध्यमांसमोर योवून सांगतात आम्हाला सरक्षण द्या, त्याच पद्धतीने आता सेना प्रमुखांचीही परिस्थिती झाली आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

तरुणांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. चार वर्षानंतर त्यांना भाजपच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देणार असे हे सांगत आहेत. देशाच्या सुरक्षेबाबत खेळण्याचे धाडस भाजप कसे करु शकते, असा सवाल पटोले यांनी केला. अग्निवीरांना आगित जाळण्याचे पाप भाजप करत आहे. तातडीने अग्निवीर योजना मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी पटोले यांनी केली.

Agnipath Scheme
एमआयएमचे एक मत राष्ट्रवादीने वळवले : खडसे, निंबाळकरांचे टेन्शन गेले

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने सुरु आहे. अनेक ठिकाणी या अंदोलनांना हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेश, बिहारसोबत तेलंगणामध्ये तरुणांनी तोडफोड करत रेल्वे डब्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहे. अंदोलनात मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काँग्रेस पक्षाकडूनही अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे. या सत्याग्रहात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com