Nana Patole News : जबरदस्त प्लॅनिंग पण ज्याची भीती होती तेच घडलं, काँग्रेसची 8 मतं फुटली; संतापलेले पटोले म्हणाले,'त्या गद्दारांना...'

Vidhan Parishad Election Results 2024 : दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीवेळी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना यावेळीही काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता.12) संध्याकाळी जाहीर झाला.या निवडणुकीत महायुतीने 11 पैकी तब्बल 9 जागा जिंकत बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.या निवडणुकीत ज्याची भीती काँग्रेससह महाविकास आघाडीला होती ती खरी ठरली.

दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीवेळी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना यावेळीही काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे अॅक्शन मोडवर आले असून पक्षविरोधी काम करणार्‍यांची तक्रार हायकमांडकडे केली असल्याची माहिती देतानाच त्यांनी अशा लोकांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली.तसेच विधान परिषद निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवणार असल्याचेही सांगितले आहे.

पटोले म्हणाले, विधान परिषदेतील विजयानंतर महायुतीला असुरी आनंद होत आहे. पण या निवडणुकीत ज्यांनी पक्षविरोधी काम केले त्यांची तक्रार आम्ही काही वेळापूर्वीच हायकमांडकडे केली आहे.तसेच त्यांचा अहवालही पाठवला आहे.त्या सर्व गद्दार नेत्यांवर अशी कडक कारवाई करण्यात येईल की, पुन्हा अशी कोणी हिंमत करणार नाही असेही पटोले म्हणाले.

Nana Patole
Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : महायुतीची तटबंदी भक्कम, काँग्रेसची मतं फुटल्यानं 'मविआ'च्या एकजुटीला तडे?

जे कुणी बदमाश आहेत.त्यांच्यावर आम्ही ट्रॅप लावला होता.ते आमच्या ट्रॅपमध्ये सापडली आहेत.अशा विश्वासघातकी अन् गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. काही नेते आमचा पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात गेले आहेत. त्यांच्यासोबतही काही आमदार होतेच. या सगळ्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. आता कोणतीही कमिटी महाराष्ट्रात येणार नाही.थेट कारवाई करण्यात येईल असा इशाराही पटोले यांनी यावेळी दिला.

विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती.काँग्रेसचे आमदार कैलास गोंरट्याल यांनी तसा खळबळजनक दावाही केला होता.लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास दुणावलेला ठाकरे गट आणि शरद पवार गट महायुतीची मतं फोडेल, अशी अपेक्षा होती.

त्यामुळे विशेषत: अजितदादा गटाच्या उमेदवारांना धोका असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवार गटाला अजितदादा गटाचे एकही मत फोडण्यात यश आले नाही. तर उद्धव ठाकरे यांनाही शिंदे गटाची मतं फोडण्यात अपयश आले.

Nana Patole
Municipal Council By Election : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com