Nana Patole : ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर, जनतेने धडा शिकवला

Maharashtra Lok Sabha Election 2024 winners :महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याच्या संकल्पाला जनतेची साथ, प्रदेश काँग्रेसचे मुख्यलय टिळक भवन येथे ढोल, ताशे, गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा
Nana Patole
Nana Patolesarkarama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. परिवर्तनाचा संदेश महाराष्ट्राने देशाला दिला आहे. लोकशाहीत जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, त्यांना निवडणुकीत जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. देशातील १० वर्षांच्या अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला ही मोठी चपराक आहे, अशी प्रतिक्रीया कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर टिळक भवनात पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला खोक्याची व्यवस्था चालत नाही हे दाखवून दिले आहे. संविधानाला पायदळी तुडवत राज्यातील मविआचे सरकार पाडले, लोकशाही व संविधानाचा अपमान केला त्यांना जनतेने या निवडणुकीत उत्तर दिले आहे. 

यापुढे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष एक नंबरचा करण्याचा संकल्प केलेला आहे, त्याची ही सुरुवात असून  देशात नरेंद्र मोदींपेक्षा कोणी मोठा नाही, त्यांना कोणी अडवणार नाही या अहंकारी वृत्तीला जनतेची हि मोठी चपराक आहे. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई पदयात्रेने देशातील चित्र बदलून टाकले व जनतेने राहुल गांधी यांना मोठे जनसमर्थन दिले आहे. या पदयात्रेने नरेंद्र मोदींशिवाय देशात नेता नाही यालाही उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर देशातील जनतेनेच शिक्कामोर्तब केले असून लोकसभा निवडणुकीतील हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालय टिळक भवन येथे फटाके फोडून गुलाल उधळला व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, जोजो थॉमस, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे आदी उपस्थित होते.

Nana Patole
Lok Sabha Election 2024 Results : मोटाभाय, ये महाराष्ट्र है... मतदारांनी वाचाळवीरांना धडा शिकवलाच...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com