Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत असं साधलं 'सोशल इंजिनिअरिंग'

Congress First List Of Lok Sabha Election : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत सर्व जाती-धर्म, तरुणांसह ज्येष्ठ नेत्यांना स्थान दिले आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वीच भाजपने आपल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसनेही (Congress) आपल्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपने साधलेले सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न काँग्रेसच्याही यादीत दिसून येत आहे. दरम्यान, भाजपने पहिल्या यादीत उत्तर भारतातील उमेदवारांवर जास्त स्थान दिले तर काँग्रेसने दक्षिण भारतावर फोकस केल्याचे दिसून येत आहे.

भाजपनंतर काँग्रेसच्या यादीकडे देशाचे लक्ष लागेल होते. काँग्रेस निवडणूक समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी उमदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 15 उमेदवार हे जनरल प्रवर्गातील आहेत. 24 उमेदवार हे अनुसूचित जाती (SC), जमाती (ST) आणि इतर मागासवर्ग (OBC) आणि अल्पसंख्याक गटातील आहेत. आपल्या 39 उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 12 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. आठ उमेदवार 50-60 वयोगटातील आहेत. तर 12 उमेदवार 61-70 वयोगटातील असून सात जणांचे वय हे 71-76 वर्षे आहे.

Congress
Lok Sabha election 2024 : मोठी बातमी! राहुल गांधींचं ठरलं, अमेठी नाही तर...; काँग्रेसची पहिली यादी जाहीर

दरम्यान, भाजपने (BJP) आपल्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. या उमेदवारांपैकी 28 महिला आहेत. 47 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आहेत. 195 पैकी 57 ओबीसी उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत भाजपने संधी दिलेली आहे.

भाजपच्या यादीत उत्तर भारतातील उमेदवारांची छाप दिसून आली. त्यात उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू कश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, तर गोवा, त्रिपुरा, अंदमान निकोबार, दमन दीव येथील प्रत्येकी एक असे एकूण 195 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Congress
Congress Loksabha Candidate : काँग्रेसचा दक्षिण भारतावर फोकस; भाजपप्रमाणे महाराष्ट्रात 'वेट अँड वॉच'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com