Narayan Rane : दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत यांची हत्याच; राणेंचा खळबळजनक आरोप!

Narayan Rane : आदित्य ठाकरे 'तिथं' उपस्थित होते, असं मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane : दिशा सालीयान (Disha Salian) मृत्यूप्रकरणी आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. यावर आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप लावले आहेत. पत्रकार परिषदघेऊन त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Narayan Rane
NCP News; नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा!

दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांची हत्याच झाली आहे, या माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. या दोघांची आत्महत्या नसून ही प्रत्यक्षात हत्या आहेत. सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरे आरोपी आहेत, आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते, असं मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं असा अतिशय गंभीर आरोप राणेंनी केला.

Narayan Rane
Jayant Patil's Suspension: निलंबनावर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया : ‘मुख्यमंत्र्यांचा तो अविर्भाव...’

मोर्चाच्या दिवशी उद्धव ठाकरे हे छाताडावर नाचू असू म्हटले होते, मात्र ठाकरे गट आता पाचव्या क्रमांकावर गेला, यासाठी संजय राऊत यांचं अभिनंदन करायला लावलं पाहिजे. कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचारवर कोणी बोलत नाही, यावर ही बोललं गेलं पाहिजे, असेही राणे म्हणाले. शिवसेनेने ठाकरे गटाकडे आता कोणीही पुरुष शिल्लक नाही. महिलेला मुख्यमंत्री करणार, असं त्यांनी सांगितलं आहे.दिनू मोर्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे, हे तपासून पाहिलं आहे, असेही राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com