Maratha Reservation : मराठा-कुणबी वेगवेगळे, जरांगेंची मागणी चुकीची; राणेंच्या विधानाने वादाची ठिणगी

Narayan Rane On Manoj Jarange Patil : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मराठा आरक्षणावरील विधानाने वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
narayan rane, manoj jarange patil
narayan rane, manoj jarange patilSarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane News : मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचा दाखला देऊन ओबीसींमध्ये समावेश करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्य सरकारला अल्टिमेटही दिला आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांची मागणी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. नारायण राणेंच्या या विधानाने वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

narayan rane, manoj jarange patil
Manoj Jarange Patil News : सरकारमुळेच आमचे बळी पडायला लागले; मुंबईतील आत्महत्येच्या घटनेनंतर जरांगे पाटलांचा आरोप

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबडच्या सुनील कावळे यांनी मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाजवळ आत्महत्या केली. यामुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारचा मराठ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पण ही मागणी चुकीची असल्याचं केंद्रीय उद्योगमंत्री आणि भाजप नेते नारायण यांनी म्हटलं आहे. कोणताही ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगेंच्या मागणीवर काय म्हणाले नारायण राणे?

'मराठा आणि कुणबी वेगळे आहेत. यात फरक आहे. एकच नाही. जरांगे म्हणतात एकच आहेत, पण एक नाहीत. जरांगे यांनी जातीचा अभ्यास करावा. घटनेचा अभ्यास करावा', असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

'कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे', असं नारायण राणेंनी सांगितलं.

सुनील कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या सुनील कावळे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. कावळे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. कॅबिनेटची बैठक अर्धवट टाकून ताबडतोब त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं. त्यांच्या मुलाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करून दिली जाईल, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. मराठा आंदोलकांवरील खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करणार आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. सुनील कावळे यांचं पार्थिव सायन रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. सायन रुग्णालयात दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

narayan rane, manoj jarange patil
Maratha Reservation News : मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढण्याचं सुनीलचं स्वप्न अपूर्णच राहिलं...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com