ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार' 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या'

'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' असे थेट आव्हान राणेंनी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) 'प्रहार'मधून दिलं आहे. नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी ‘हार आणि प्रहार’ या सदरातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Narayan Rane Uddhav Thackeray
Narayan Rane Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यातील वाद नवीन नाही. चिपी विमानतळावर दोघांचा रंगलेला कलगीतुरा सगळ्यांनी पाहिलाच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही (Uddhav Thackeray) आणि नारायण राणेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

'सामना'तूनही नारायण राणेंवर टीकेचे बाण नेहमीच सोडले जातात. आता 'सामना'च्या टीकेच्या सडेतोड उत्तर देण्यासाठी नारायण राणेंनी ;प्रहार'मधून कंबर कसली आहे. आज राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 'प्रहार' केला आहे. 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' असे थेट आव्हान राणेंनी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) 'प्रहार'मधून दिलं आहे. नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी ‘हार आणि प्रहार’ या सदरातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

'प्रहार' वर्तमानपत्रामधून देखील 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघात केला आहे. ''मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!' कि किती हा बोगसपणा? किती खोटारडेपणा ?? किती ही बनवाबनवी ??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद!!'' अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांवर तोडंसुख घेतलं आहे.


Narayan Rane Uddhav Thackeray
देशमुख, परमबीर सिंह हनीमूनला गेले आहेत का? त्यांना मस्ती आलीये!

''मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपूजेनंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय? त्यांनी उधळलेल्या फुलांची एक-एक पाकळी शिवसैनिकांनी घरातल्या कपाटात नेऊन ठेवली, तर ती धनलक्ष्मी होणार आहे काय? त्यातून शिवसैनिकांचा संसार चालून उदरनिर्वाह होणार आहे काय?' 'मागच्या दोन वर्षात त्यांनी शिवसैनिकांच्या नोकरी-धंद्याचा, पोटा-पाण्याचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला काय? शिवसैनिक या मानवी रुपातील शस्त्राला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवण्यासाठी काय केले? या दोन वर्षांत शिवसैनिकांच्या हातावर तुम्ही काय ठेवलं? असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला.

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कुणावर आसूड ओढणार.., असा उल्लेख सामनामध्ये आला आहे. त्यांचे कुणाशी वैमनस्य आहे? सांगावे की! महाराष्ट्राच्या जनतेवर आसुड ओढणार का? हिंमत असेल, तर अंगावर या, ही डरकाळी आहे का? डरकाळी कुणी द्यावी? कुणाच्या जीवावर? भाषण करताना हात वर करून आव आणणं वेगळं आणि अंगावर आलेल्यांना समोरून जबाब देणं वेगळं. शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही. कुणाच्या गालाला पाच बोटं सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता?', असा टोला राणेंनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com