One Nation One Election : मोदी अन् आरएसएसचा राज्यघटनेशी संबंध नाही, म्हणूनच 'वन नेशन-वन इलेक्शन' ; आंबेडकरांची टीका!

Prakash Ambedkar On One Nation One Election : "आपले अजेंडे साध्य करण्यासाठी, वन नेशन वन इलेक्शनसारखे मुद्दे पुढे..."
One Nation One Election :
One Nation One Election :Sarkarnama

Ahmednagar News : संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले असतानाच 'एक देश एक निवडणूक' ('वन नेशन वन इलेक्शन') हा विषय यानिमित्ताने पुढे येत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. 'आरएसएस, भाजप आणि नरेंद्र मोदी यांचा राज्यघटनेशी संबंध नसून, त्यांचा विरोधच असल्याचे सांगत, त्यामुळेच 'वन नेशन-वन इलेक्शन' माध्यमातून ही मंडळी आपली भूमिका मांडत आहेत, अशी टीका केली. (Latest Marathi News)

One Nation One Election :
NCP Meeting News : राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना प्रथमच मिळाली नेतृत्वाची संधी !

'वन नेशन-वन इलेक्शन' यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2024 निवडणुकी पूर्वी विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून विरोधकांना मोठा धक्का दिला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांच्या अमानुष मारहाणी घटनेची माहिती घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले असता, श्रीरामपूर इथे माध्यमांशी बोलताना वन नेशन वन इलेक्शन मुद्यावर त्यांनी भाजपवर टीका केली.

One Nation One Election :
INDIA Alliance Meeting : पटना, बंगळुरू, मुंबईनंतर 'इंडिया'ची चौथी बैठक 'या' शहरात ? मुख्यमंत्र्यांनी घातली गळ !

आरएसएस, भाजप आणि मोदींना भारत हा युनियन स्टेट आहे हेच मान्य नसल्याचा आरोप करत त्यांचा संविधानाशी संबंध नसल्याची टीका केली. त्यामुळेच ही लोकं आपले म्हणणे, वन नेशन वन इलेक्शनसारखे मुद्दे पुढे आणत आहेत. मात्र हे मुद्दे जनतेला मान्य होणार नाहीत. आता कोणतेही मुद्दे त्यांनी पुढे आणले, तरी त्याचा त्यांना फटकाच बसेल असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.

(Edited - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com