Prakash Ambedkar News : 'ठाकरेंचा उमेदवारच त्यांची साथ सोडणार', प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा

Amol Kirtika : अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून लढत असेल तरी त्यांचे वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत. यावरून प्रकाश आंबेडकरांनी टीका केली.
Prakash Ambedkar Uddhav Thackeray
Prakash Ambedkar Uddhav ThackeraySararnama

Mumbai Political News : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर लढत आहेत. वंचितचे परमेश्वर रणशूर हे देखील याच मतदारसंघातून उमेदवार आहेत. अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्या मुख्य लढत होत असताना अमोल किर्तिकर हे निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुंबई उत्तर पश्चिममध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर Amol Kirtikar उध्दव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण, निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात ?, असा सवाल देखील आंबेडकर Prakash Ambedkar यांनी उपस्थित केला.

सत्ता घरातच हवी...

अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून लढत असेल तरी त्यांचे वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत. यावरून प्रकाश आंबेडकरांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे, असे आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस प्रचारातून गायब

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना ठाकरे गट सांगतो की त्यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे. मात्र, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील.

ठाकरे-शिंदे एकत्र येण्याचा दावा

प्रकाश आंबेडकर यांनी या आधी देखील लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याचा दावा केला होता. ठाकरे गटाकडून हा दावा फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असून उद्धव ठाकरेंच्या प्रचारात बाॅम्बस्फोटाचे आरोपी आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंसोबत येण्याचा दावा फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com