Dombivli news : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासह मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींनी जाहीर सभा घेतली. मुंबईत मोदी यांचा रोड शो देखील झाला. याला मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईत प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविली. काँग्रेसच्या शहजाद्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला हे सगळ्यांनी पाहिले. संपूर्ण महाराष्ट्राला याचा राग आला. पण नकली शिवसेनेने तोंडाला कुलुप लावले, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
महायुतीकडून (Mahayuti) निवडणूक लढविणारे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. यामध्ये मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेत शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली. हिंमत असेल तर वीर सावरकारांचा मोठेपणा सांगणारी 5 वाक्य शहजाद्यांना बोलायला लावावीत, असे माझे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला आव्हान आहे, असे मोदी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज बाळासाहेबांबाबत बोलणारे देखील काँग्रेसचा कुर्ता घेऊन उभे राहिले आहेत. काँग्रेस (Congress) पक्ष फुटीरतावादी, दहशतवाद्यांना सर्रासपणे पाठिंबा देत आहे. नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे. काँग्रेसचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. काँग्रेसच्या शहजाद्यांनी तर स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला हे तुम्ही पाहिले आहे ना? महाराष्ट्रातील नागरिकांना याचा राग आला. मात्र नकली शिवसेना तोंडाला कुलूप लावून बसली आहे.
शहजादे महाराष्ट्राच्या जमिनीवर सतत वीर सावरकरांचा अपमान करतात. मात्र त्यांना कोणताही जाब विचारण्याची हिंमत नकली शिवसेनेमध्ये नाही. हिंमत असेल तर वीर सावरकारांचा मोठेपणा सांगणारी 5 वाक्य शहजाद्यांना बोलायला लावावीत, असे आव्हान मोदींनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला दिले. काँग्रेस कधीही विकासाचा विचार करु शकत नाही. काँग्रेसला मतांसाठी फक्त हिंदू-मुसलमान करणे माहिती आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.